पुणेकरांना मिळणार कचऱ्यातून पैसे!

प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्या अथवा मेटालिक कॅन आदी वस्तू तुम्ही रस्त्यावर अथवा कचऱ्याच्या डब्ब्यात टाकता. आता मात्र हाच कचरा तुम्हाला पैसे मिळून देणार आहे.
Garbage ATM
Garbage ATMSakal

पुणे - प्लास्टिक (Plastic) आणि काचेच्या बाटल्या (Glass Bottle) अथवा मेटालिक कॅन (Metalic Can) आदी वस्तू तुम्ही रस्त्यावर अथवा कचऱ्याच्या डब्ब्यात टाकता. आता मात्र हाच कचरा (Garbage) तुम्हाला पैसे (Money) मिळून देणार आहे. शहरात चाळीस ठिकाणी कचऱ्याचे एटीएम (ATM) बसविण्यात येणार आहे. त्यामध्ये हा कचरा टाकला, तर तुमच्या खात्यात ऑनलाइन पैसे जमा होणार आहेत.

पुणे शहरात दररोज विविध प्रकाराचा कचरा निर्माण होतो. नियोजनबद्ध पद्धतीने हा कचरा जमा केल्यास व त्याचा वापर पुनर्वापरासाठी केल्यास महापालिकेवरील ताणदेखील कमी होणार आहे. तसेच नागरिकांनाही स्वच्छतेबाबत जाणीव निर्माण होणार आहे. या हेतूने ‘इको मॅक्स गो इंडिया’ या स्टार्टअप कंपनीने हा प्रस्ताव महापालिकेला दिला आहे. त्यास प्रशासनाने मान्यता दिली असून, लवकरच स्थायी समिती आणि मुख्य सभेत मान्यतेसाठी याबाबतचा प्रस्ताव येणार आहे.हे ‘एटीएम’ मशिन कंपनीतर्फे मोफत महापालिकेला पुरविण्यात येणार आहेत. तसेच पुढील दहा वर्षे देखभाल-दुरुस्ती करण्याची तयारीदेखील या कंपनीने दर्शविली आहे. त्यासाठी महापालिकेने शहरातील पंधरा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ४ बाय ४ फुटांच्या चाळीस जागा आणि एमटीएम मशिनसाठी वीजपुरवठा कनेक्शन द्यावे, अशी मागणी कंपनीने केली आहे. मशिन चालू झाल्यानंतर पहिले तीन महिने महापालिकेने विजेचा पुरवठा करावयाचा आहे, असेही या प्रस्तावात म्हटले आहे.

Garbage ATM
गुरूवारी पुणे शहरातील लसीकरण मोहीम राहणार बंद

शहरात चाळीस ठिकाणी बसविणार कचऱ्याचे एटीएम

असा होणार वापर...

सहा फूट उंच आणि चार फूट रुंद असलेल्या या मशिनमध्ये नागरिकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाद्वारे रजिस्ट्रेशन करावयाचे आहे, तसेच मशिनचा वापर करताना कचऱ्याचा प्रकार निवडायचा आहे. उदा. प्लास्टिकची बाटली, काचेची बाटली, धातूचे कॅन्स किंवा प्लास्टिक रॅपर्स. कचऱ्याचा प्रकार निवडल्यानंतर मशिनमध्ये तो कचरा टाकल्यानंतर प्रति प्लास्टिक बाटलीसाठी १ रुपया, काचेच्या बाटलीसाठी प्रतिनग ३ रुपये, तर धातूच्या कॅन्ससाठी २ रुपये, प्लास्टिक रॅपर्ससाठी २० पैसे, असे संबंधित नागरिकांच्या खात्यात जमा होणार आहेत.

देशभरात आठ हजार मशिन

देशभरात या कंपनीमार्फत आतापर्यंत कोलकाता, दक्षिण दिल्ली, उत्तर दिल्ली, शिमला, बंगलोर, वाराणसी, लखनौ इत्यादी ठिकाणी सुमारे ८ हजार मशिन बसविण्यात आल्या आहेत. दिल्ली आणि शिमला येथे गेल्या पाच वर्षांपासून या मशिनचा वापर सुरू आहे. मिनिस्ट्री ऑफ अर्बन डेव्हलपमेंट विभागाने या मशिन नोटिफाइड केलेल्या आहेत. या मशिनवार तिन्ही बाजूस स्क्रीन असून त्याचा वापर कशा पद्धतीने करावयाचा आहे, त्याची माहिती देण्यात आलेली आहे, तर या मशिनमध्ये जमा होणाऱ्या कचऱ्याची वाहतूक संबंधित कंपनीमार्फतच केली जाणार आहे.

Garbage ATM
विरोध झुगारून 'ॲमेनिटी स्पेस' भाडेतत्त्वावर देण्यास मान्यता

शहरात दररोज निर्माण होणारा कचरा

(समाविष्ट ११ गावांसह) - २००० ते २१०० टन

ओल्या कचऱ्याचे प्रमाण - सुमारे १००० टन

सुक्या कचऱ्याचे प्रमाण - १००० ते १२०० टन

पुनर्वापर योग्य कचऱ्याचे प्रमाण - १०० ते १२० टन

आपल्याला काय वाटतं?...

हा उपक्रम पुणे शहरासाठी फायदेशीर ठरणार का?... यासंबंधी आपली मते १०० शब्दांत कळवा editor@esakal.com वर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com