सलाम त्या रिक्षावाल्याला! लग्नासाठी जमवलेल्या पैशांतून भागवतोय ४०० जणांची भूक!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

अक्षय कोठावळे (वय ३०) असे रिक्षाचालकाचे नाव आहे. ते महात्मा फुले पेठेत राहतात. अक्षय यांचा मे महिन्यात विवाह होते. त्यासाठी त्यांनी २ लाख रुपये जमा केले होते. मात्र, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे संवेदनशील अक्षय यांना रस्त्यावरून पायी जाणारे कामगार तसेच गोरगरीब लोकांचे जेवणाअभावी होणारे हाल कमी करण्याची निर्णय घेतला. विवाहासाठी जमविलेल्या रकमेतून शहरात रस्त्यावर दिसणाऱ्या उपाशीपोटी नागरिकांना एकवेळचे जेवण देण्याचा उपक्रम हाती घेतला.

पुणे :  लॉकडाऊनमुळे गोरगरीब नागरिक, कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत एक संवेदनशील रिक्षाचालक स्वत:च्या विवाहासाठी जमा केलेल्या रकमेतून दररोज सुमारे चारशे परप्रांतिय कामगार तसेच रस्त्यावरील गोरगरीब नागरिकांना जेवणाचे वाटप करत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अक्षय कोठावळे (वय ३०) असे रिक्षाचालकाचे नाव आहे. ते महात्मा फुले पेठेत राहतात. अक्षय यांचा मे महिन्यात विवाह होते. त्यासाठी त्यांनी २ लाख रुपये जमा केले होते. मात्र, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे संवेदनशील अक्षय यांना रस्त्यावरून पायी जाणारे कामगार तसेच गोरगरीब लोकांचे जेवणाअभावी होणारे हाल कमी करण्याची निर्णय घेतला. विवाहासाठी जमविलेल्या रकमेतून शहरात रस्त्यावर दिसणाऱ्या उपाशीपोटी नागरिकांना एकवेळचे जेवण देण्याचा उपक्रम हाती घेतला.

Image may contain: 2 people, people standing, child, shoes and outdoor

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
अक्षय हे केवळ जेवण वाटप करण्यावर थांबले नाहीत तर ते ज्येष्ठ नागरिक तसेच गर्भवती महिलांना त्यांच्या रिक्षातून हॉस्पिटलमध्ये सोडण्याचे काम करत आहेत. तसेच, या कामासाठी ते कोणाकडूनही एक रुपयाही घेत नाहीत. यासोबतच रिक्षावर बसवलेल्या स्पिकरच्या माध्यमातून कोरोनापासून बचाव कसा करावा, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम सुरू असते. दरम्यान, या कामात सहकारी रवींद्र गायकवाड हेदेखील त्यांना मदत करतात.

'ते' विद्यार्थी अडकले होते दिल्लीत, पण बार्टीने....

मी लग्नासाठी दोन लाख रुपये जमविले होते.२५ मे रोजी माझे लग्न होते. मात्र, लॉकडाऊनचा कालावधी वाढविल्यामुळे ते पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. रस्त्यावरून असंख्य लोक चालत जाताना दिसले. त्यांच्याकडे एकवेळच्या जेवणाचे पैसे नाहीत, हे पाहून मी आणि माझ्या मित्रांनी या कामगारांसाठी काहीतरी मदत करण्याचा निर्णय घेतला. मित्रांच्या मदतीने पोळी-भाजी तयार करून रस्त्याने चालत जाणारे कामगार आणि गरजूंना वाटप करण्याचे काम सुरू केले. मागील दीड महिन्यापासून आम्ही पुणे रेल्वे स्टेशनच्या जवळील मालधक्का चौक, संगमवाडी, येरवडा या भागात जेवणाचे वाटप केले जात आहे, असे अक्षय यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनो, परीक्षा रद्द केल्यास 'कोरोना बॅच'चा शिक्का मारला जाणार

या कार्याबद्दल अक्षय यांचा श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदीर ट्रस्टचे विश्वस्त शिरीष मोहिते, शाहीर हेमंत माळवे, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ आणि रिक्षा चालक संघटनेचे खजिनदार बापू भावे यांच्या हस्ते ट्रस्टतर्फे सत्कार करण्यात आला. 

पुण्याच्या शास्त्रज्ञांनी शोधली महाकाय आकाशगंगा; ब्रह्मांडाच्या निर्मितीचे उलगडणार रहस्य​

वडिलांच्या मृत्यूनंतरही जेवण वाटपाचे काम सुरू
अक्षय यांच्या वडिलांचे १८ मे रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तेही आॅटोरिक्षाचालक म्हणून काम करीत होते. मात्र, वडिलांच्या निधनाचे दु:ख असतानाही अक्षय यांनी गरिबांसाठी सुरू केलेल्या जेवण वाटपाचे काम थांबविणार नाही, असा निर्धार केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In pune a rickshaw Drivers is using money collected for the wedding to feed the hungry people