रिंगरोडची रुंदी
रिंगरोडची रुंदीsakal media

पुणे : रिंगरोडची रुंदी तीन प्रकाराची होणार

पीएमआरडीएच्या हद्दीत हा रस्ता काही भागात ११० मीटर रुंदीचा हा रस्ता असणार आहे.

पुणे : शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) रिंगरोडची रुंदी आता तीन प्रकाराची असणार आहे. महापालिकेच्या हद्दीत ६५ मीटर, तर काही ठिकाणी नव्वद मीटरचा हा रस्ता असणार आहे. मात्र पीएमआरडीएच्या हद्दीत हा रस्ता काही भागात ११० मीटर रुंदीचा हा रस्ता असणार आहे. रिंगरोडबाबतच्या वारंवार बदलणाऱ्या धोरणामुळे विकास आराखड्यात दर्शविण्यात आलेल्या या रस्त्यांची रुंदी कमी करण्यासाठी आता पुन्हा एकदा ३७ (१) कार्यवाही करावी लागणार आहे.

पीएमआरडीएने प्रादेशिक विकास आराखड्यातील रिंगरोड विकसित करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला. एकूण १२८ किमी लांबीचा हा रिंगरोड होता. पहिल्या टप्प्यात तो ९० मिटर रुंदीचा होता. परंतु मध्यंतरी एमएसआरडीसीच्या रिंगरोड प्रमाणेच तो ११० रुंदीचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु त्यांची रुंदी पुन्हा बदलण्याचा प्रस्ताव पीएमआरडीएने राज्य सरकारकडे पाठविला होता. त्यास राज्य सरकारच्या नगर विकास खात्याने नुकतीच मान्यता दिली. त्याबाबतचे आदेश नगर विकास खात्याचे अवर सचिव किशोर गोखले यांनी काढले. त्यावर हरकती-सूचना दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहेत.

रिंगरोडची रुंदी
SRH Player Retention : ऑरेंज आर्मीचा जम्मूच्या पोरांवर विश्वास

पीएमआरडीएचा रिंगरोड हा १२८ किलोमीटर लांबीचा होता. परंतु पीएमआरडीए आणि एमएसआरडीसी या दोन्ही रिंगरोडमध्ये सुमारे १५ किलोमीटरचे अंतर आहे. दोन्ही रिंगरोड काही गावांमध्ये एकमेकांना ओव्हरलॅप होतात. त्यामुळे ज्या गावांमध्ये हे दोन्ही रिंगरोड एकमेकांना ओव्हरलॅप होत आहे, अशा गावांमधील असा सुमारे ४० किलोमीटर लांबीचा एमएसआरडीसीचा रिंगरोड वगळण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. मध्यंतरी तो पुन्हा एमएसआरडीकडे वर्ग करण्यात आला. त्यामुळे पीएमआरडीएच्या रिंगरोड आता ८८ किलोमीटर लांबीचा होणार आहे. त्यामध्येही तो वेगवेगळ्या रुंदीचा असणार आहे. त्यामुळे शहर व पीएमआरडीएच्या हद्दीतून जाणार हा एकच रस्ता वेगवेगळ्या रुंदीचा असणार आहे.

अशी होणार रुंदी कमी जास्त
महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेली ३४ गावांमधून जाणाऱ्या या रिंगरोडची रुंदी ६५ मीटर असणार आहे. काही भागात हाच रस्ता ९० मीटर रुंदीचा दर्शविण्यात आला आहे. पीएमआरडीएच्या हद्दीत परंतु एमएआरडीसी विकास करणार असल्या रस्त्याची रुंदी ही ११० मीटर असणार आहे. राज्य सरकारने रस्त्याची रुंदी कमी केल्यामुळे एमएसआरडीसीचा ४० किलोमीटर लांबीचा मार्ग वगळता अन्य भागात विकास आराखड्यात दर्शविण्यात आलेल्या भागातील रस्त्याची रुंदी कमी करण्यासाठी ३७ (१) कारवाई महापालिकेला करावी लागणार आहे. त्यातून अनेक प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रिंगरोडची रुंदी
CSK Player Retention : चेन्नईने धोनीपेक्षा जाडेजासाठी मोजली मोठी किंमत

रिंगरोड दृष्टिक्षेपात
* एकूण रिंगरोड ८५.६३ किमी लांबीचा
* काही भागात ६५ मीटर तर काही भागात ९० मीटर रुंदीचा
* हवेली, खेड, मावळ आणि मुळशी या तालुक्यातून जाणार
* मावळ तालुक्यातील परंदवाडी ते खेड तालुक्यातील सोलू दरम्यानचा रस्ता एमएसआरडीसीकडे
* या दरम्यानच्या रस्त्याची रुंदी ११० मीटरच राहणार
* रुंदी कमी करण्याचा निर्णयामुळे महापालिकेला विकास आराखड्यात बदल करावा लागणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com