रिंगरोड : भंडारा डोंगराला बोगदा नाहीच

मुंबईतील बैठकीत निर्णय; डोंगराच्या बाजूने रिंगरोडचे नियोजन
ringroad
ringroadsakal

इंदोरी : महाराष्ट्र राज्य विकासमंडळाने (एमएसआरडीसी) पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रस्तावित केलेला ११० मीटररुंदीचा रिंगरोड मावळातील श्रीक्षेत्र भंडारा डोंगरास भेदून अथवा बोगदा पाडून होणार होता. परंतु तीव्र विरोधामुळे सरकारने हा निर्णय बदलून भंडारा डोंगराच्या बाजूने रिंगरोड होईल, असा निर्णय मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेतला. या बैठकीस संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.

या निर्णयामुळे मावळ जनता, भारतीय किसान संघ, भंडारा डोंगर देवस्थान, पंचक्रोशी व वारकरी संप्रदाय यांनी आनंद व्यक्त केला आहे. या निर्णयाचे स्वागत माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव शेलार, देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब काशीद, किसान संघ तालुका अध्यक्ष शिवाजी पवार, अनंत चंद्रच्यूड यांनी केले. रिंगरोडमध्ये भंडारा डोंगराला बोगदा पाडण्याचा प्रस्ताव होता.

ringroad
अहो आश्‍चर्यम्‌..! भर पावसात रंगला खेळ डांबरीकरणाचा..!

त्याला भंडारा डोंगर ट्रस्ट, भारतीय किसान संघांचा विरोध होता. डोंगराचे महात्म्यास धक्का लागू नये व भाविकांचे श्रद्धेस तडा जाऊ नये म्हणून अनेक निवेदने देण्यात आली. अनेकदा अधिकाऱ्यांबरोबर बैठका झाल्या. २७ ऑगस्ट रोजी ‘पीएमआरडीए’च्या आयुक्तांबरोबर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी कृती समितीसह चर्चा करून ठाम विरोध दर्शविला. सर्व जनतेच्या भावना व विनंतीचा आदर ठेवून सरकारने मूळ निर्णय बदलून भंडारा डोंगराच्या बाजूने रिंगरोड होईल व त्यानुसार सर्व्हे करण्यात येईल, असा निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com