पुणे : गोऱ्हे खुर्द येथे अपघात, एकाचा मृत्यू दोन जखमी

सकाळी साडेसात वाजता घडली.
अपघात
अपघातsakal

खडकवासला : पुणे पानशेत रस्त्यावर गोऱ्हे खुर्द येथे मोटार खड्डयात पडून झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा तरुणाचा मृत्यू झाला आहे. दोन जण जखमी आहेत. सकाळी साडेसात वाजता घडली. नितीन घाणेकर (वय २२, रा. राजेंद्रनगर तेंडुलकर पार्क नवी पेठ) असे मृत पावलेले तरुणाचे नाव असून शंतनू वडनेरे (वय २२ रा.कमला नेहरू पार्क समोर) शुभम ढेबे (रा.२४, रा. सिंहगड रोड विठ्ठलवाडी) असे दोन जखमींची नावे आहेत.

शंतनू हा गाडी चालवत होता. रस्त्यावर वाळू पडली होती. त्यावरून मोटार गेल्याने ती घसरून खड्ड्यात पडली. ही घटना सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या वेळेस घडली आहे. यावेळी गोऱ्हे खुर्द येथील पोलीस पाटील कालिदास माताळे यांनी जखमींना तिघांना रुग्णालयात पाठवले याबाबत हवेली पोलिस अधिक तपास करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com