Pune Accident : बोअरवेल ट्रक खाली सापडून तरुणीचा जागीच मृत्यू Pune road Accident wagholi police investigation crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Crime

Pune Accident : बोअरवेल ट्रक खाली सापडून तरुणीचा जागीच मृत्यू

Pune Accident - बोअरवेल ट्रकखाली सापडल्याने दुचाकीवरील तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वाघोली-केसनंद रोडवरील नायरा पेट्रोलपंपासमोर गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. दुचाकीवरील तरुणही जखमी झाला आहे.

गौरवी रवींद्र जाधव ( वय 19,सध्या रा. गुलमोहर सोसायटी,वाघोली, मुळगाव - कोल्हापूर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, आशिषकुमार व गौरवी हे दोघे दुचाकींवर जात असताना ट्रकचा दुचाकीला धक्का लागल्याने ते दोघे खाली पडले.

गौरवी त्याच ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर आशिषकुमार हा जखमी झाला. याप्रकरणी आशिषकुमार याने पोलिसात फिर्याद दिली. ट्रक चालक लक्षुमन चीन्नास्वामी ( वय 39, सध्या रा कोलवडी, ता हवेली ) याला अटक करण्यात आली आहे. गौरवी हिचे एअर होस्टेज बनण्याचे स्वप्न होते. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महादेव लिंगे करीत आहेत.