पुणे : लूटमार करणारी टोळी जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

शुभम संतोष कांबळे (वय 19 रा.पाषाण, पुणे), विजय सटवा देडे (20 रामनगर, वारजे माळवाडी), ओंकार अरुण वांजळे (वय 19 रा.वारजे माळवाडी) चैतन्य पंडित तोडकर (वय 19 कामना वसाहत, कर्वेनगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

पुणे - निर्जनस्थळी रात्रीच्या वेळेस पायी जाणाऱ्या एकट्या माणसाला गाठून कोयत्याचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या चोरट्याच्या टोळीस हडपसर पोलिसांनी जेरबंद केले. सोळा मोबाईल व तीन दुचाकी असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

शुभम संतोष कांबळे (वय 19 रा.पाषाण, पुणे), विजय सटवा देडे (20 रामनगर, वारजे माळवाडी), ओंकार अरुण वांजळे (वय 19 रा.वारजे माळवाडी) चैतन्य पंडित तोडकर (वय 19 कामना वसाहत, कर्वेनगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

हडपसर पोलीस ठाणे हद्दीत पोलीस पेट्रोलिंग करत असताना संशयित चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पुणे शहरात निर्जनस्थळी पायी जाणाऱ्या एकट्या माणसाला दुचाकीवरून येऊन दुचाकी आडवी लावून बळजबरीने कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील असलेले मोबाईल, पैसे, दुचाकी चोरी करण्याचे प्रकार वाढत आहेत. याचे हडपसर पोलिसांनी लक्ष ठेवून संशयितांना ताब्यात घेतले होते, पोलिसांनी खाक्या दाखवला असता चौघांनी कबुली दिली आहे. वेगवेगळ्या कंपनीचे सोळा मोबाईल स्मार्ट फोन, कॅमेरा, तीन दुचाकी ताब्यात घेतले. हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, गुन्हे पोलीस निरीक्षक अंजुमन बागवान, सहायक पोलिस निरीक्षक संदीप देशमाने, हेमंत पाटील युसूफ पठाण ,प्रमोद टिळेकर, राजू वेगरे ,सदोबा भोजराव , गणेश दळवी, विनोद शिवले, प्रताप गायकवाड, नितीन मुंढे, अमित कांबळे, दाऊद सय्यद यांनी कामगिरी केली.

Web Title: Pune: Robbery gang ransacked