Pune : कात्रज कोंढवा रस्त्याच्या भूसंपदनासाठी २०० कोटी रुपये मंजूर; भूसंपादन आॅक्टोबरपूर्वी पूर्ण ?

कात्रज-कोंढवा हा रस्ता सध्या ३२ मीटरचा असला तरी तो अपुरा आहे, त्यामुळे महापालिकेने मोठा गाजावाजा करून ८४ मीटर पर्यंत रुंदीकरणाचा निर्णय घेतला. त्यामुळे या परिसरातील वाहतूक सुरळीत होणार आहे.
pune
punesakal

पुणे - भूसंपादनामुळे रखडलेल्या कात्रज कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी आॅक्टोबरपूर्वी जागा ताब्यात घेऊन लगेच त्याचे काम सुरू करू असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, राज्य सरकारकडून मंजूर झालेले २०० कोटी रुपये अद्याप महापालिकेच्या तिजोरीत जमा न झाल्याने भूसंपादन कसे करणार हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

pune
Ncp Sharad Pawar Mumbai : सुमारे ५० हजार पुस्तिका काढणार ; राज्य सरकारच्या विरोधात निकाल वाचनाची राष्ट्रवादीची मोहीम..!

कात्रज-कोंढवा हा रस्ता सध्या ३२ मीटरचा असला तरी तो अपुरा आहे, त्यामुळे महापालिकेने मोठा गाजावाजा करून ८४ मीटर पर्यंत रुंदीकरणाचा निर्णय घेतला. त्यामुळे या परिसरातील वाहतूक सुरळीत होणार आहे. पण भूसंपदनाअभावी ही गेल्या पाच वर्षात केवळ २८ टक्के काम पूर्ण झाले आहे.

pune
Mumbai Crime : बुकी अनिल जयसिंघानीला अन्य एका गुन्ह्यांत अटक

या रस्त्यामध्ये ज्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांनी महापालिकेकडे रोख नुकसान भरपाई मागितलेली आहे. त्यामुळे टीडीआर, एफएसआयच्या रूपात मोबदला घेण्यास जागा मालकांनी नकार दिला आहे. महापालिकेला या प्रकल्पासाठी २ लाख ८८ हजार चौरस मीटर जागा आवश्‍यक असून, अद्याप १ लाख २८ हजार चौरस मीटर जागेचे भूसंपादन झालेले नाही. त्यामुळे हे काम ठप्प आहे.

pune
Mumbai : एसटीचे कर्मचारी ताटकळत उभे होते अन् मंत्री दीपक केसरकर रात्री ९ वाजता उद्घाटनाला पोहचले

जागा मालकांना रोख मोबदला देता यावा यासाठी महापालिकेने ८४ मीटर ऐवजी ५० मीटरचा रस्ता विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. भूसंपादनासाठी २८० कोटी रुपये आवश्‍यक आहेत. त्यातील २०० कोटी रुपये राज्य सरकार देणार आहे.

pune
Mumbai : एसटीचे कर्मचारी ताटकळत उभे होते अन् मंत्री दीपक केसरकर रात्री ९ वाजता उद्घाटनाला पोहचले

तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच २०० कोटी रुपये मंजूर केले आहेत, असे पुण्यात बोलताना स्पष्ट केले होते. पण हा निधी अद्याप महापालिकेच्या तिजोरीत जमा झालेला नाही. त्यामुळे महापालिका भूसंपादन कसे करणार असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

pune
Pune : टिंबर मार्केटचे होणार स्थलांतर ?

महापालिकेकडून यादी तयार

महापालिकेच्या भूसंपादन विभागाने कात्रज कोंढवा रस्त्याच्या ५० मीटरच्या रुंदीकरणामध्ये ज्या जागा मालकांचे भूखंड येतात, त्यांची यादी तयार केली आहे. त्यानुसार शासकीय नियमाने त्यांना मोबदला दिला जाणार आहे.

pune
Mumbai Fraud : मुलांना रेल्वेत नोकरीच्या आमिषाने शेतकऱ्याची 12 लाखांची फसवणूक; पोलिसांकडून तपास सुरू

‘‘कात्रज कोंढवा रस्त्याच्या भूसंपदनासाठी २०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत, हे पैसे लवकरच मिळतील. जागा मालकांची यादीही तयार केली आहेत. पैसे मिळताच भूसंपादनाची प्रक्रिया आॅक्टोबर पर्यंत पूर्ण केली जाईल. त्यानंतर रस्त्याचे काम सुरू होईल. पुढील काही महिन्यात कात्रज कोंढवा रस्त्याचे रुंदीकरणाचे काम पूर्ण होऊ होईल.’’

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com