तृतीयपंथीयांना मॅरेथॉनमधून पुणेकरांचा माणुसकीचा हात 

pune-running-marathon
pune-running-marathon

पुणे - "वुई आर सपोर्टिंग ट्रान्सजेंडर' असा सामाजिक संदेश देत पुणेकर रविवारी जोमाने धावले. सुमारे 1300 धावपटूंचा सहभाग असलेल्या या मॅरेथॉनमध्ये ज्येष्ठांबरोबर लहान मुलांचाही सहभाग लक्षवेधी होता. निमित्त होते "पुणे रनिंग स्पोर्टस फाउंडेशन' संस्थेतंर्गत "लास्ट संडे ऑफ मंथ'तर्फे आयोजित केलेल्या "पुणे रनिंग मॅरेथॉन'चे. 

पुणे पीपल्स को-ऑप बॅंक अध्यक्ष जनार्दन रणदिवे, "ऍपलॉड एनजीओ'च्या कार्यकर्त्या अनुजा वाघोलीकर व अनुराधा वाघोलीकर आणि तृतीयपंथी सोनाली दळवी, संतोषी कदम यांच्या हस्ते मॅरेथॉनचे उद्‌घाटन झाले. "शनिवारवाडा पुण्याची शान, कसबा गणपतीचा पहिला मान, शिवरायांना कोटी कोटी प्रणाम, पुण्यनगरीला सलाम, तृतीयपंथीयांना देऊ माणुसकीचा हात, या चळवळीत लाभू दे सगळ्यांची साथ' असा संदेश देत मॅरेथॉन धावली. शनिवार पेठेतील रमणबाग शाळेतून पहाटे पावणेसहा वाजता सुरू होऊन सकाळी साडेसहा वाजता ती संपली. या मॅरेथॉनचे "पेठ ग्रुप'ने नेतृत्व केले. 3, 5 आणि 10 किलोमीटरमध्ये ही स्पर्धा झाली. याप्रसंगी "पुणे रनिंग स्पोर्टस फाउंडेशन'चे अध्यक्ष सुधींद्र हरिभट तसेच सरिता राठी, मिलिंद वाणी, राकेश वर्मा उपस्थित होते. गेली नऊ वर्षे सामाजिक स्तरावर पुणे रनिंगच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com