वाघोलीत ३० चालकांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

वाघोली - पुणे ग्रामीण वाहतूक विभागाने बेशिस्त वाहतूक करणाऱ्या ३० चालकांवर कारवाई केली. तसेच, त्यांच्याकडून सहा हजार रुपये दंड वसूल केला. वाघोली परिसरात मंगळवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

वाघोली - पुणे ग्रामीण वाहतूक विभागाने बेशिस्त वाहतूक करणाऱ्या ३० चालकांवर कारवाई केली. तसेच, त्यांच्याकडून सहा हजार रुपये दंड वसूल केला. वाघोली परिसरात मंगळवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

वाघेश्‍वर मंदिर ते केसनंद फाटादरम्यान रोजच वाहतूक कोंडी होते. यादरम्यानच्या तिन्ही चौकांत अनेक वाहनचालक उलट्या दिशेने ये-जा करतात. तसेच, साइड रस्त्यावर वाहने लावली जातात. त्यामुळे कोंडीत भर पडते. अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने सोमवारी लेक्‍सिकॉन स्कूलला सुटी दिली होती. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच पुणे ग्रामीण वाहतूक विभागाने आज दुपारी अचानक केसनंद फाटा येथे बेशिस्त वाहतूक करणाऱ्या ३० चालकांवर कारवाई केली.

पुणे ग्रामीण वाहतूक विभागाचे काही कर्मचारी येथे वाहतूक नियंत्रणाचे काम करतात. मात्र, त्यांना कोंडीमुळे बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारची कारवाई नियमितपणे सुरू राहील.
- अरुण मोरे, पोलिस निरीक्षक, पुणे ग्रामीण वाहतूक विभाग 

Web Title: Pune Rural Traffic Police Action on 30 drivers in Wagholi

टॅग्स