पुण्यातील सलोनी व जयदीप अडकले चीनमध्ये

Pune : Saloni and Jaideep stuck in China (Photo Credit : BBC)
Pune : Saloni and Jaideep stuck in China (Photo Credit : BBC)

पुणे : चीनमध्ये थैमान घालणा-या कोरोना विषाणू आजाराचा सर्वाधिक प्रार्दुभाव असलेल्या वुहान शहराजवळ असलेल्या परिसरातच पुण्यातील सलोनी त्रिभुवन आणि जयदीप देवकाते हे दोन विद्यार्थी अडकले आहेत. चीनमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था काही दिवसांपासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे हे विद्यार्थी आहे त्याच ठिकाणी थांबून आजाराचा प्रार्दुभाव कमी होण्याची वाट पाहत आहेत.

कोरेगाव पार्कचे नाव राहणार कायम; 'हे' नाव करण्याचा होता प्रस्ताव

सलोनी हिने एका माध्यमाशी बोलताना सांगितले की, "वैद्यकीय शिक्षणासाठी मी चीनमध्ये आले आहे. माझ्यासोबत भारतातील 30 विद्यार्थी या ठिकाणी आहोत. वुहान शहरापासून काहीच किलोमीटर अंतरावर आम्ही राहतो. आम्ही राहत असलेल्या ठिकाणी देखील कोरोनाचे विषाणू पसरले असून त्याचे रुग्ण आढळले आहेत. किती दिवस अशीच परिस्थिती राहणार असा प्रश्‍न आम्हाला पडला आहे.''

कोरोनाला घाबरू नका; अशा प्रकारे घ्या काळजी

विद्यार्थांना कोरोनाच्या विषाणूंची लागण होऊ नये म्हणून विद्यापीठाने त्यांना मास्क पुरवले आहे. तसेच वसतिगृहाच्या बाहेर पडण्यात मज्जाव करण्यात आला आहे. जेवण आणि सुरक्षात्मक बाबींविषयी सलोनी हिने सांगितले की, ""आम्ही शिकत असलेल्या विद्यापीठाने रूम बाहेर जाण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे खाण्यासाठी आवश्‍यक असलेल्या वस्तू आणण्यासाठी आम्हाला बाजारापेठांत जात येत नाही. मात्र वसतिगृहातच आमच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे. गेल्या नऊ दिवसांपासून आम्ही रूममध्येच आहोत. विद्यापीठाकडून आम्हाला मास्क देण्यात आले आहेत. येथील परिस्थिती खरात होत असून भीती वाढत चालली आहे.'' जयदीप हा पिंपरी-चिंचवड येथील आहे. त्याच्याशी मात्र अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही.

काहीही करून घरी या
आमचे पालक आम्हाला म्हणताय की काहीही करून घरी या. मात्र येथील विमानतळे देखील बंद आहेत. भारतात परतण्यासाठी आम्ही येथील भारतीय दूतावास कार्यालयाशी संपर्क करीत आहोत. देशातील सरकारने या प्रश्‍नाकडे लक्ष द्यावे, अशी विनंती सलोनी हिने केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com