सांगवीकर डासांच्या त्रासाने हैराण

रमेश मोरे
गुरुवार, 29 मार्च 2018

जुनी सांगवी-  मुळा व पवना नदीपात्रातील जलपर्णीमुळे सांगवीत डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाढलेल्या जलपर्णीमुळे गेली दोन महिन्यांपासुन सांगवीकरांना डासांच्या उपद्रवाला तोंड द्यावे लागत आहे. यावर प्रशासनाकडुन तात्काळ उपाययोजना सरू करून सांगवीकरांना डासमुक्त करावे अशी मागणी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सांगवीत जलपर्णीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सध्या सुरू असलेल्या उपाय योजना तोकड्या असुन, नियमित धुरीकरण व जलपर्णी काढण्याचे काम तात्काळ पुर्ण करण्यात यावे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्याचा ईशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

Web Title: pune sanghvi facing problem of mosquito