Pune : सांगवीत बारा तास वीज गायब; रस्ता कामात केबल तुटल्याने विजेचा खोळंबा

याआधी गत आठवड्यात येथीलच पिण्याच्या पाण्याची वाहिनी तुटल्यामुळे पवार नगर रहिवाशी व सांगवी करांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता.
pune
punesakal

रमेश मोरे: सकाळ वृत्तसेवा

जुनी सांगवी - जुनी सांगवी तील पवार नगर येथे गुरूवार ता.४ सायंकाळच्या सुमारास रस्ता खोदकामात केबल तुटल्याने रहिवाशांना दहा ते बारा तास वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.

यामुळे सांगवी भागातील इतर भागातही यामुळे विजपुरवठा खंडीत झाला.मुख्य विजपुरवठा वाहिनी केबल तुटल्याने याचा मधुबन, शितोळे नगर, ढोरे नगर,पवार नगर ,शिंदे नगर,मुळा नगर आदी भागावर परिणाम झाला.

याआधी गत आठवड्यात येथीलच पिण्याच्या पाण्याची वाहिनी तुटल्यामुळे पवार नगर रहिवाशी व सांगवी करांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. पाणीपुरवठा वाहिन्या तुटणे,विज वाहिन्या तुटणे या घटनांमुळे ऐन उन्हाळ्यात ठेकेदार व संबंधित प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे पवार नगर रहिवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

pune
Mumbai : तिकीट चेकिंग साठी युपीआय/ क्युआर कोड पेमेंटसह टीसी सज्ज!

गुरूवारी रात्री दोन वाजेपर्यंत येथील दुरुस्तीचे काम सुरू होते.संबंधित ठेकेदार व महावितरण कर्मचारी यांच्याकडून तुटलेली केबल दुरुस्त करून अखेर विज पुरवठा सुरळीत करण्यात आला.दरम्यान इतर भागात यांचा परिणाम होवून वारंवार विजपुरवठा खंडीत होण्याच्या त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागले.यामुळे वारंवार होणा-या अशा घटनांमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

कोट- नागरिकांच्या पाणी व विज पुरवठा खंडीत होण्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो.कामे करताना नागरिकांना अडचणी निर्माण होणार नाहीत याची संबंधितांनी काळजी घ्यायला हवी.प्रशांत शितोळे माजी नगरसेवक

कोट- रस्त्याचे काम सुरू असल्याने संबंधित ठेकेदाराकडून येथे केबल तुटली होती.ती पुर्ववत जोडण्यात आली आहे.महावितरण कर्मचारी व संबंधितांकडून काम पूर्ण करण्यात आले आहे.

रत्नदीप काळे अभियंता सांगवी महावितरण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com