साप्ताहिक सकाळसोबत मिळवा सोने-चांदी शॉपिंग पुस्तिका मोफत

टीम ई-सकाळ
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

पुणे : दसरा म्हटलं की, सगळ्यांनाच ओढ़ लागते ती खरेदीची. मग ते दागदागिने असो किंवा, मोबाइल फोन्स, कपडे असो किंवा मोटरगाडी, ऑनलाइन शॉपिंग असो किंवा विंडो शॉपिंग. सगळीकडे आपल्याला खरेदीसाठी गर्दीच गर्दी पहायला मिळते. विशेषतः दसऱ्याच्या खरेदीला सोन्याची दुकानं गर्दीनं फुलून जातात. 

पुणे : दसरा म्हटलं की, सगळ्यांनाच ओढ़ लागते ती खरेदीची. मग ते दागदागिने असो किंवा, मोबाइल फोन्स, कपडे असो किंवा मोटरगाडी, ऑनलाइन शॉपिंग असो किंवा विंडो शॉपिंग. सगळीकडे आपल्याला खरेदीसाठी गर्दीच गर्दी पहायला मिळते. विशेषतः दसऱ्याच्या खरेदीला सोन्याची दुकानं गर्दीनं फुलून जातात. 
No photo description available.

No photo description available.

काय आहे पुस्तिका?
या पार्श्वभूमीवर सकाळ माध्यम समूहाने तुमच्यासाठी शॉपिंग स्पेशल मॅगझीन प्रसिद्ध केलंय. यावेळचा साप्ताहिक सकाळचा अंक हा शॉपिंग स्पेशल आहे. ज्यामध्ये तुम्हाला शॉपिंगसाठी म्हणून जे काही लागेल ते मिळणार आहे. या शॉपिंगमध्ये दसऱ्याचं शॉपिंग थोडं वेगळं असतं. त्यात सोन्याचा चांदीच्या खरेदीला विशेष महत्व असतं. त्यामुळेच आम्ही या शॉपिंग विशेषांकासोबत सोन्या चांदीच्या खरेदी संदर्भातील एक पुस्तिकाही देत आहोत. श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्स यांची 20 पानी पुस्तिका साप्ताहिक सकाळच्या अंकासोबत तुम्हाला मिळणार आहे. त्यात तुम्हाला सुंदर, आकर्षक, मनमोहक आणि विलोभनीय दागिन्यांची डिझाइन्स पहायला मिळणार आहेत. तसेच सोने खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्या ग्राहकांना http://nagarkarjewellers.com/ वर क्लिक करून अमर्यादित पर्याय आणि ऑफर्सही पहायला मिळणार आहेत. उद्यापासून (6 ऑक्टोबर) हा अंक बाजारात उपलब्द होणार आहे. ही पुस्तिका पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यापुरतीच वितरणासाठी मर्यादीत आहे.

Image may contain: 1 person, smiling

सकाळची प्रकाशने
वाचनानंदाची अनोखी अनुभूती देणारी ‘सकाळ साप्ताहिक’, ‘तनिष्का’ आणि ‘प्रीमियर’ ही ‘सकाळ माध्यम समूहा’ची प्रकाशने आहेत. यात येणारे लेख म्हणजे वाचकांसाठी पर्वणी असते. संपूर्ण कुटुंबासाठी वाचनीय आणि उपयुक्त साहित्य देणाऱ्या ‘सकाळ साप्ताहिक’मधून ताज्या घटना, घडामोडींवरील भाष्य, विश्‍लेषण याबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख, तरुण पिढीला प्रेरित करतील अशा जगभरातील तज्ज्ञांच्या व्याख्यानांचा गोषवारा वाचकांपर्यंत पोचवला जातो. शब्दकोडे, शेअर बाजार, ग्रहमान ही अत्यंत वाचनीय सदरे हा ‘साप्ताहिक सकाळ’चा अविभाज्य भाग आहे. आपल्या जवळच्या बुक स्टॉल वर जा आणि सकाळ साप्ताहिक शॉपिंग स्पेशल हा अंक विकत घ्या. अंकाची किंमत फक्त 15 रुपये आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune saptahik sakal gold shopping festival issue dasara 2019