Pune : सारसबाग चौपाटीचे रुप पालटणार

सारसबागेच्या चौपाटी रुप पालटण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे
Pune
Punesakal

पुणे : सारसबागेच्या चौपाटी रुप पालटण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या चौपाटीमुळे अतिक्रमण, अस्वच्छता निर्माण होत आहे. त्याऐवजी महापालिकेतर्फे या ठिकाणी सर्व स्टॉलची स्वतंत्रपणे रचना केली जाणार आहे. तसेच या रस्त्याचे सुशोभीकरण करून नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था केली जाणार आहे. पुढील काही दिवसात याचा आराखडा अंतिम होणार आहे.

सारसबाग येथे रस्त्याच्या दुतर्फा खाद्य पदार्थांचे स्टॉल, खेळणी असे व्यावसायिक आहेत. महापालिकेने या परिसरात ५३ जणांना स्टॉलसाठी परवानगी दिलेली आहे. पण या व्यावसायिकांनी स्टॉलचे रूपांतर हॉटेलमध्ये केले आहे. रस्त्यावर फरशी, शेड टाकून व्यवसाय सुरू केला आहे. याठिकाणच्या कामगारही याच ठिकाणी राहायला असतात. त्यामुळे मे महिन्यात कारवाई करून ५३ गाळे सील केले होते. त्यानंतर अतिक्रमण काढून टाकून रस्ता मोकळा केला. पण आता पुन्हा पूर्वीसारखे अतिक्रमण होत आहे.

महापालिका आयुक्तांनी सारसबाग चौपाटीची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये सर्वांना एक सारखे स्टॉल दिले जाणार आहे. त्यासाठी आकर्षक रचना केली जाणार आहे. प्रत्येक स्टॉलपुढे मर्यादित टेबल खुर्चीची सुविधा असणार आहे. त्याचे प्रमाणे नागरिकांना चालत फिरण्यासाठी खास पादचारी मार्ग केला जाणार आहे. त्यामुळे या चौपाटीचे रुप पालटून जाणार आहे. त्याचा आराखडा नुकताच महापालिकेला सादर झाला आहे. त्यात व्यावसायिकांशी चर्चा करून व आवश्‍यक ते बदल करून यासाठीचे कम सुरू होणार आहे.

मंदिराच्या बाजूचे दुकान काढणार ?

सारसबागेच्या चौपाटीवर दोन्ही बाजूने दुकाने आहेत. सारसबागेच्या सीमा भिंतीला लागून असलेली सर्व दुकाने समोरच्या बाजूला हलवली जाणार आहेत. तेथील खेळण्यांसाठीही स्वतंत्र व्यवस्था केली जाईल. सीमा भिंतीच्या बाजूने पादचारी मार्ग विकसित करण्याचे महापालिकेने प्राथमिक विचार केला आहे. पण सर्व व्यावसायिकांचा विचार करून अंतिम निर्णय होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com