'प्रयोगशाळा'

शुक्रवार, 11 मे 2018

पुणे - वाहतूक सुरळीत करण्यासाठी सातारा रस्त्यावर गेल्या १३ वर्षांमध्ये तब्बल ७ प्रयोग करण्यात आले. या प्रयोगांमध्ये मिळून सर्वसामान्य नागरिकांचे ४०८ कोटी रुपये खर्च झाले आणि तरीही पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न कायमच आहे.

‘जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत महापालिकेला मिळालेल्या निधीतून सातारा आणि सोलापूर रस्त्यावर प्रायोगिक तत्त्वावर ‘बीआरटी’चा प्रयोग राबविण्यात आला. सिमेंटचा रस्ता झाल्यावर ‘बस लेन’चा प्रयोगही करून पाहण्यात आला. 

गेल्या १३ वर्षांत या रस्त्याची, नाल्यावरील पुलांची, सहा वाहनतळांची कामे झाली; तसेच ‘बीआरटी’ही अस्तित्त्वात आणण्याचे प्रयत्न टप्प्याटप्याने सुरू झाले. त्यातूनही वाहतूक कोंडी फुटली नाही. यामुळे जेधे चौक व धनकवडीत उड्डाण पूल करण्यात आले. पुष्प मंगल कार्यालय चौक आणि व्होल्गा चौकाजवळ भुयारी मार्ग निर्माण करण्यात आले. इतके करूनही मूळ प्रश्‍न सुटत नसल्यामुळे गेल्या वर्षी जानेवारीत फेररचनेचे काम हाती घेण्यात आले.

बीआरटीबाबत सूचना पाठवा..फेसबुक आणि ट्विटरवर 
#PuneBRT
ई-मेल करा webeditor @esakal.com वर 

(क्रमशः)

Web Title: Pune satara road BRT issue