सातारा रस्ता बीआरटीसाठी होऊ दे खर्च!

पुणे शहरातील पहिला बीआरटी मार्गावर असलेल्या स्वारगेट ते कात्रज चौक या बीआरटी मार्गावरील खर्चाची मालिका काही थांबण्यास तयार नाही.
BRT Line
BRT LineSakal
Summary

पुणे शहरातील पहिला बीआरटी मार्गावर असलेल्या स्वारगेट ते कात्रज चौक या बीआरटी मार्गावरील खर्चाची मालिका काही थांबण्यास तयार नाही.

पुणे - शहरातील पहिला बीआरटी मार्गावर (BRT Route) असलेल्या स्वारगेट ते कात्रज चौक या बीआरटी मार्गावरील खर्चाची (Expenditure) मालिका काही थांबण्यास तयार नाही. तब्बल ११० कोटी रुपये खर्च करून सुरू झालेल्या या मार्गावर असुविधा कायम आहे. ही अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी आता पुन्हा एकदा या मार्गावर पाच कोटींचा खर्च प्रस्तावित केला आहे.

महापालिकेची २००७ मध्ये महापालिकेची निवडणुकीच्या तोंडावर स्वारगेट ते कात्रज चौक हा साडेपाच किलोमीटरचा प्रयोगिक तत्वावर मार्ग तयार करण्यात आला. बीआरटीचा प्रकल्प हा देशातील पहिला प्रकल्प असल्याने त्याचा मोठा गाजावाजा झाला, पण याठिकाणी बससेवा सुरू झाल्यानंतर वारंवार होत असल्याने अपघातांमुळे तो वादग्रस्त ठरला.

शेकडो कोटी खर्चूनही सुविधा मिळेणा

शेकडो कोटी रुपये खर्च करून देखील नागरिकांना हवी तशी चांगली सुविधा मिळत नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात जात होती. तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न कायम राहिला आहे. त्याचा परिणाम शहरातील इतर रस्त्यांवर बीआरटी सेवा सुरू केली जाणार होती, पण अनेक ठिकाणचे प्रकल्प रखडले आहेत.

आत्तापर्यंत ५०० कोटीपेक्षा जास्त खर्च

याएकाच प्रकल्पावर आत्तापर्यंत ५०० कोटीपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहेत. त्यानंतर आता महापालिकेच्या २०२२-२३च्या अंदाजपत्रकात खास कात्रज ते स्वारगेट या बीआरटी मार्गासाठी ५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये देखभाल दुरुस्तीचे काम करणे यासाठी १ कोटी आणि सातारा रस्ता बीआरटी मार्ग विकसित करणेसाठी ४ कोटी रुपये अशी तरतूद केली आहे. तर नगर रस्त्याच्या बीआरटीची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी व शिमला ऑफिस चौक ते औंध येथे बीआरटी मार्ग विकसित करण्यासाठी प्रत्येकी ५० लाखांची तरतूद केली आहे.

BRT Line
बारामती नगरपालिका प्रक्रीया केलेल्या पाण्याच्या विक्रीतून उत्पन्न मिळविणार

बीआरटी मार्गातील त्रुटी...

  • सिग्नल यंत्रणा कार्यान्वित नाही

  • मार्गदर्शक फलक खराब झाले आहेत

  • भारती विद्यापीठ थांबा येथील दारे तुटली आहेत

  • अनेक थांब्यांवरील लाइट बंद

  • बसथांब्यावर घाणीचे साम्राज्य

  • बीआरटी मार्गाच्या रेलिंग तुटलेल्या आहेत

  • खासगी वाहनांची घुसखोरी रोखण्याकडे दुर्लक्ष

अशी आहे स्थिती...

  • स्वारगेट ते कात्रज चौक या ५.५ किलोमीटरच्या रस्त्यामध्ये १० बसथांबे आहेत

  • २००७ ला प्रकल्प पूर्ण केल्यानंतर स्वारगेट व धनकवडी या तीन ठिकाणी उड्डाणपूल बांधल्याने या मार्गावर अवघ्या दोन किलोमीटरचा पूर्ण बीआरटी मार्ग शिल्लक

  • यातील त्रुटी दूर करण्यासाठी २०१६-१७ मध्ये ८० कोटी रुपयांचा आराखडा तयार

  • हे काम २०१९ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते

  • काम रखडल्याने या प्रकल्पाचा खर्चही ३५ कोटी रुपयांनी वाढून एकूण ११५ कोटी रुपये खर्च केला

  • २०२१ मध्ये मार्गाची व बसथांब्याची पुनर्रचना

  • त्यामध्येही अनेक त्रुटी असल्याने प्रवाशांचे हाल सुरूच

स्वारगेट ते कात्रज बीआरटी चांगली चालवली तर या रस्त्यावर मेट्रोची गरज पडणार नाही. चार वर्षांपूर्वी याच रस्त्यासाठी १०० कोटींपेक्षा जास्त खर्च केला आहे. तरीही रेलिंग तुटलेली आहे, वाहनांची घुसखोरी आहे. स्वारगेट येथील बसथांब्याचा वापरही होत नाही. असे असताना पुन्हा कोट्यवधीचा खर्च केला तरी नागरिकांना सुविधा मिळणार आहेत का?

- संजय शितोळे, मानद सचिव, पीएमपी प्रवासी मंच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com