रस्ता केला, उड्डाण पूल केला, आता मेट्रो?

शनिवार, 12 मे 2018

पुणे - महापालिकेच्या नियोजनाचा गोंधळ कसा असतो, याचे उदाहरण म्हणून सातारा रस्त्याच्या कामाकडे पाहता येईल! सध्या सातारा रस्त्याच्या फेररचनेचे काम सुरू आहे... त्यातच उड्डाण पूल आणि भुयारी मार्गाचेही नियोजन आहे... पण हे सगळं करताना या रस्त्यावर एलिव्हेटेड मेट्रो करायची असेल, तर हा रस्ता पुन्हा उखडावा लागणार आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जाऊ नये, यासाठी महापालिकेकडे सध्यातरी कोणतेही नियोजन नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पिंपरी-स्वारगेट मेट्रो मार्गाचे कात्रजपर्यंत विस्तारीकरण करण्याची मागणी झाल्याने आता स्वारगेट-कात्रज मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे. कात्रज, धनकवडी हा परिसर स्वारगेटच्या तुलनेत उंचावर आहे. त्यामुळे एलिव्हेटेड मेट्रो करायची असेल, तर नेहरू रस्त्यापर्यंत सरकावे लागेल किंवा ‘सिटी प्राइड’पर्यंत मेट्रो भुयारी करावी लागेल. त्यासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. त्यातच, या रस्त्यावर जेधे चौक, धनकवडी येथे उड्डाण पूल; तर साईबाबा मंदिर आणि पुष्प मंगल कार्यालय चौकात भुयारी मार्ग व चैतन्यनगरमध्ये पादचारी पूल आहेत. या रस्त्यावर एलिव्हेटेड मेट्रो करण्यासाठी पुन्हा खोदाई करावी लागेल. मेट्रो प्रकल्पाची नजीकच्याच भविष्यातील गरज लक्षात घेऊन महापालिकेने अद्याप नियोजन केलेले नाही. (क्रमशः)

सगळं शक्‍य आहे..!
जेधे चौक आणि धनकवडीतील उड्डाण पूल उभारताना मेट्रोचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेण्यात आले आहे. तसेच ‘बीआरटी’ प्रकल्प सामावून घेऊन मेट्रोही शक्‍य असल्याचा महापालिकेचा दावा आहे.

बीआरटी थांबे
  कात्रज चौक
  कात्रज डेअरी
  भारती विद्यापीठ 
  शाहू बॅंक, धनकवडी
  अहल्यादेवी चौक
  चव्हाणनगर
  वाळवेकरनगर
  अरण्येश्‍वर कॉर्नर
  सिटी प्राइड
  पंचमी हॉटेल चौक

पुनर्रचना
कात्रज चौक ते पंचमी हॉटेल चौक 5.4
किलोमीटर

Web Title: Pune satara road metro issue