पुणे-सातारा रस्त्यावर वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 जानेवारी 2019

खेड - शिवापूर - थर्टी फर्स्ट साजरा करून पुण्याकडे परतणाऱ्या नागरिकांमुळे मंगळवारी पुणे-सातारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच ससेवाडी उड्डाण पुलावर बंद पडलेला कंटेनर उशिरापर्यंत हटविण्यात आला नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

सायंकाळी पाच वाजल्यापासून पुण्याकडे येणारी वाहनांची संख्या वाढली होती. त्यामुळे चेलाडी फाटा, खेड-शिवापूर टोलनाका आणि वेळू फाट्यावर वाहतूक कोंडी झाली होती. येथील वाहतूक संथ गतीने सुरू होती. त्यातच सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास ससेवाडी उड्डाण पुलावर चालकाचे नियंत्रण सुटून एक कंटेनर सेवा रस्ता आणि मुख्य रस्त्यावर अडकला. त्या कंटेनरखाली एक दुचाकी अडकली. सुदैवाने या अपघातात कोणाला दुखापत झाली नाही. मात्र या कंटेनरमुळे येथील वाहतूक कोंडीत भर पडून ससेवाडी ते वेळू-बागपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. 

त्यातच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची (एनएचएआय) पेट्रोलिंग व्हॅन सुमारे दोन तासांनी घटनास्थळी आली. ‘एनएचएआय’च्या पेट्रोलिंग पथकाकडे येथील कंटेनर बाजूला घेण्यासाठी क्रेन उपलब्ध नव्हती. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत हा कंटेनर त्याठिकाणी उभा होता. 

पेट्रोलिंग पथकाच्या या भोंगळ कारभारामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीत अडकून मनस्ताप सहन करावा लागला. रात्री उशीरापर्यंत या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कायम होती.

Web Title: Pune Satara Road Traffic