Sun, April 2, 2023

Pune : सातवनगरमध्ये जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया
Published on : 3 December 2022, 7:35 am
उंड्री : कुमार पेबल पार्ककडून सातवनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जलवाहिनी आज (शुक्रवार, दि. २ डिसेंबर, २०२२) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास फुटून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. प्रा. समीर चौगुले आणि स्थानिक नागरिक अर्जुन सातव म्हणाले की, एका बाजूला आम्हाला पिण्यासाठी पाणी मिळत नाही आणि दुसरीकडे जलवाहिनी फुटून पाणी वाया जात आहे,
असा विरोधाभास दिसत आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी हडपसर क्षेत्रीय कार्यालयाकडे जलवाहिनी फुटल्याची तक्रार केली. मात्र, रात्री आठवाजेपर्यंत जलवाहिनी दुरुस्त न झाल्यामुळे पाणी वाहत असल्याचे नागरिकांनी सांगितले.