‘सायफाय’मध्ये विज्ञानपट

Pune-Sci-Fi-fest
Pune-Sci-Fi-fest

पुणे - पुणे सायन्स फिल्म फेस्टिव्हल (पुणे सायफाय फेस्ट) शुक्रवार (ता. २१) ते रविवार (ता. २३) यादरम्यान राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात पार पडणार आहे. ‘लाइफ - अर्थ अँड बियाँड’ ही यंदाच्या विज्ञानपट महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना असून, पृथ्वीवरील जीवसृष्टीचे विज्ञान आणि पृथ्वीबाहेरील संभाव्य जीवसृष्टीचा वेध, या विषयांवरील चित्रपट, माहितीपट विज्ञानप्रेमींना महोत्सवात पाहायला मिळतील. मान्यवर शास्त्रज्ञांची व्याख्याने आणि वैज्ञानिक प्रयोगांचे सादरीकरण हेसुद्धा महोत्सवाचे आकर्षण असेल.

संशोधन, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय), आशय फिल्म क्‍लब, रावतं नेचर ॲकॅडमी (आरएनए) यांच्या वतीने फेस्टचे आयोजन करण्यात येते. एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम म्हणाले, ‘‘महोत्सवाचे उद्‌घाटन शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता ज्येष्ठ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. योगेश शौचे यांच्या व्याख्यानाने होईल. सायफाय फेस्टमध्ये ‘लाइफ’, ‘ज्युरासिक पार्क’, ‘काँटॅजिऑन’ आणि ‘कॉन्टॅक्‍ट’ हे इंग्रजी चित्रपट, तर ‘व्हायरस’ हा मल्याळी चित्रपट दाखविण्यात येईल.

‘डीएनए अँड जेनेटिक्‍स’, ‘अर्थ - ए हिस्टरी’ आणि ‘फाइंडिंग लाइफ बियाँड अर्थ’ हे माहितीपटही उपस्थितांना पाहता येतील.’’ याशिवाय महोत्सवादरम्यान सूक्ष्मजीवशास्त्र आणि रेडिओ खगोलशास्त्रासंबंधीचे वैज्ञानिक सादरीकरणही आयोजित करण्यात आले आहे, असेही मगदूम यांनी सांगितले.

पुणे सायफाय फेस्टसाठी किमान वयोमर्यादा १४ वर्षे असून, त्यापुढील कोणालाही या महोत्सवात मोफत प्रवेशिकेद्वारे प्रवेश मिळेल. अधिक माहितीसाठी www.sanshodhan.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com