अबब ! एकाच वेळी १० पेटंट केले फाईल ; पुण्याच्या वैज्ञानिकाची कमाल

Pune Scientist Filed 10 patent at a time
Pune Scientist Filed 10 patent at a time

पुणे : येथील भारतीय हवामान खात्यात वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. शिरीष योगराज खेडीकर यांना एकाच वेळी चक्क 10 पेटंटची नोंद केली आहे. नुकतेच लावलेल्या 10 यंत्रणांच्या शोधासाठी त्यांनी 'पेटंट्स, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्स, कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया' मध्ये याची नोंद केली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
नवनवीन शोध लावण्याची आवड असल्यामुळे त्यांनी हे 10 शोध विविध क्षेत्रात केले आहेत. या पूर्वी त्यांनी पीएचडी करीत असताना दोन तर, शास्त्रज्ञ प्रशिक्षण दरम्यान एक असे तीन पेटंटचे अर्ज भरले होते.

Coronavirus: पुण्यात रुग्णांची संख्या 39; आठ जण बरे होऊन घरी परतले
या यशाबद्दल डॉ. शिरीष म्हणाले, "हवामानशास्त्र विभागात कार्यरत असल्यामुळे माझे बरेच शोध त्या संबंधी असतात. अनेकदा विविध यंत्र तयार करण्याचे विचार येतात, काही शक्य होतात काही नाही. परंतु या दहा शोधांपैकी नऊ यंत्र आकाश, वायु, अग्नी, जल आणि पृथ्वीशी संबंधित आहेत. यांना पंचमहाभूते असे म्हणले जाते. यातील बऱ्याच यंत्रणांची चाचणी यशस्वी झाली आहे आणि काहींची सुरु आहे. "

'एमटीएस' परीक्षा कोरोना लाॅकडाऊन मुळे स्थगित
कार्यालयात काम करताना व रोजच्या दैनंदिन जीवनात अनेक अडचणी यायच्या. यासाठी उपाय म्हणून स्वतः या अडचणींना दूर करण्यासाठी यंत्रणांचा शोध लावण्यास सुरवात केली. हे सर्व शोध पूर्ण करत असताना इंटरनेटवर सहज आढळून आले की, एक दिवशी 5 पेटंट्सचे नोंद करण्याचा विक्रम आधीच एक व्यक्तीने केला आहे. त्या क्षणी ठरवले की याचा दुप्पट म्हणजेच 10 पेटंट्सचे नोंद एकाच दिवशी करून एक नवीन 'रेकॉर्ड' तयार करायचा.
Coronavirus: पुण्यात रुग्णांची संख्या 39; आठ जण बरे होऊन घरी परतले 

"जर तुमच्या मनात एखादी कल्पना आहे, त्यावर लगेच शोध लावण्यास सुरुवात करा. वस्तू तयार करा आणि पेटंटची नोंद करा. अशा प्रकारच्या प्रयोगांमुळे तंत्रज्ञानाचा क्षेत्रात देश वेगाने विकास करेल."
- डॉ शिरीष वाय. खेडीकर, वैज्ञानिक - भारतीय हवामानशास्त्र विभाग

या दहा यंत्रणांसाठी पेटंटची नोंद

- वारा गुणधर्म नोंद करण्यासाठी यंत्र 
- सूर्यप्रकाशाच्या प्रखर वेळेला डिजिटल आकड्यात रूपांतरित करण्यासाठी स्कॅनर
- इनबिल्ट एलईडीसह सोलर ट्रॅकिंग पॅनेल 
- सूक्ष्म हवामान नियंत्रित मच्छरदाणी 
- दुहेरी पाते आणि वॉटर पंपसाठी संयुक्त मोटर असलेले एअर कूलर
- स्वयंचलित पाण्याची पातळी शोधण्यासाठीचे यंत्र 
- मल्टिफंक्शनल ड्युअल स्क्रीन पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस
- अग्निशामक बाण आणि धनुष्य 
- डास निर्मूलन यंत्र 
- स्वयंचलित उघडणारे आणि बंद होणारे रस्ता दुभाजक 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com