Pune : जेष्ठ रंगकर्मी जयमाला इनामदार जीवनगौरव पुरस्काने सन्मानीत

कलाकारांनी कलेची सेवा करत रहावी.
मेघराज राजेभोसले
मेघराज राजेभोसलेsakal

आंबेगाव : युवा कलाकारांनी लघुपट या प्रभावी माध्यमाकडे गांभीर्याने बघायला हवे.लघुपट ऑस्करला जाऊ शकतो याची माहिती लघुपट निर्मात्यांना होत नाही.यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ काम करते आहे.नवख्या कलाकारांना कलाक्षेत्रात येणाऱ्या कोणत्याही अडचणीला चिटपट महामंडळ सदैव कटिबद्ध आहे.

कलाकारांनी कलेची सेवा करत रहावी.असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केले.युवा संवाद सामाजिक संस्था आयोजित पुणे आंतरराष्ट्रीय युवा शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन कै. अभिजित कदम विरंगुळा केंद्र आंबेगाव बुद्रुक येथे करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाचे उदघाटन आमदार भीमराव तापकीर,माजी नगरसेवक युवराज बेलदरे यांच्या हस्ते करण्यात आले.युवा लघुपट महोत्सवात एकूण सत्त्याऐशी लघुपट सहभागी झाले होते.पैकी वीस नामांकन मिळालेल्या लघुपटांचे प्रदर्शन महोत्सवात करण्यात आले.महोत्सवात 'अंतर' लघुपटाने सर्वोत्कृष्ट लघुपट प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले तर 'डोब्या' लघुपटास द्वितीय क्रमांक, 'द रिप्रायजल' लघुपटास तृतीय क्रमांक मिळाला.अनामिका लघुपटास उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला.

युवा शॉर्टफिल्म महोत्सवाचे औचित्य साधून संस्थेच्यावतीने देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ रंगकर्मी जयमाला इनामदार यांना मेघराज राजेभोसले, चित्रपट दिग्दर्शक अनिल राऊत,अभिनेता सिद्धार्थ भोकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.जीवनगौरव स्विकारताना जयमाला इनामदार भावुक झाल्या.माहेरचा सन्मान मिळाल्याने कृतर्थतेची भावना मनात असल्याचे इनामदार म्हणाल्या.

उपस्थित दिग्दर्शक अनिल राऊत यांनी नवोदित दिग्दर्शकांना मार्गदर्शन केले. तसेच चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण करणाऱ्या सर्व कलावंताना शुभेच्छा दिल्या. यावेळी,फुलचंद चाटे,अजय वीरकर,राजकुमार धुरगुडे, संदीप बेलदरे,आकाश गायकवाड,युवा संवाद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनराज गरड,पल्लवी जगताप,जेष्ठ पत्रकार सुभाषचंद्र जाधव, समीर देसाई आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन दीपक कसबे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com