Pune : सांडपाण्यामुळे नैसर्गिक ओढा झाला दुर्गंधीयुक्त गंटारगंगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

  bad river Health issue

Pune : सांडपाण्यामुळे नैसर्गिक ओढा झाला दुर्गंधीयुक्त गंटारगंगा

उंड्री - पुणे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या हांडेवाडी, उंड्री, शेवाळेवाडी, उरुळी देवाची परिसरामध्ये उंच उंच इमले उभे राहिले. मात्र, सांडपाणी ओढ्यामध्ये सोडल्याने नैसर्गिक ओढ्यामध्ये गवत झाडी आणि कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

प्रशासनाने ओढ्याची स्वच्छता करून सांडपाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.हांडेवाडी-उरुळी देवाची दरम्यानचा ओढा एक साखळी (३३ फूट रुंद) असून, या ओढ्यामध्ये स्वच्छ पाणी वाहत होते. मात्र, बांधकाम व्यावसायिकांनी सांडपाणी थेट ओढ्यात सोडल्याने पाणी दूषित झाले आहे.

त्यामुळे ओढ्यालगतच्या विहिरी-बोअरवेलच्या पाण्याचे स्रोत खराब झाल्याने नागरिकांना पोटाचे विकार वाढले आहेत, अशी तक्रार माऊली हांडे, धनंजय हांडे, संजय जाधव, रामदास न्हावले, अभिजित बहिरट यांनी केली.शहर-उपनगरालगतचा परिसर असला, तरी आजही मोठ्या प्रमाणात शेती असून, मका, गहू, कांदा, फ्लॉवर, पालक कोबी अशी पिके शेतकरी घेत आहेत.

मात्र, मोकाट कुत्री आणि डुकरांकडून पिकांची मोठ्या प्रमाणावर नासधूस होत असल्याने शेतकरी बांधव त्रासले आहेत. पालिका प्रशासनाने मोकाट कुत्री, डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी दादासाहेब हांडे, बाळासाहेब हांडे, काळूराम हांडे यांनी केली आहे.

महापालिकेमध्ये गाव समाविष्ट झाले असून, आजही गावपण कायम आहे. आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज, पाणी या सुविधा मिळाव्यात एवढीच माफक अपेक्षा येथील नागरिकांची आहे. प्रत्येक गावाच्या बाजूला स्वच्छ पाण्याचा ओढा असतो. मात्र, अलीकडे अतिक्रमणे आणि सांडपाणी ओढ्यामध्ये सोडल्याने ओढ्याचा कायापालट झाला आहे.

ओढ्यात दुर्गंधीयुक्त पाणी झाले असून, ओढ्याच्या काठावर कचरा साचल्याचे चित्र पाहण्याची वेळ आली आहे, असे जयश्री हांडे, कल्पना हांडे, राजश्री न्हावले, गायत्री हांडे यांनी सांगितले.

दरम्यान, हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील महापालिका सहायक आयुक्त प्रसाद काटकर म्हणाले की, नैसर्गिक ओढ्यांची पाहणी करून सांडपाणी ओढ्यात सोडणाऱ्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.

टॅग्स :Pune NewswaterRiverhealth