Pune : लग्नाच्या आमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार

सूरज दशरथ काटकर (वय २६, रा. फुरसुंगी, हडपसर) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणी ही सध्या कामानिमित्त पुण्यात वास्तव्यास आहे.
sexually assaulted
sexually assaultedsakal

पुणे - लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. तसेच, आरोपीने या तरुणीकडून तीन लाख रुपये आणि सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी तरुणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूरज दशरथ काटकर (वय २६, रा. फुरसुंगी, हडपसर) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणी ही सध्या कामानिमित्त पुण्यात वास्तव्यास आहे.

आरोपी काटकर याने तरुणीला लग्न करण्याचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी दिली.

तिच्याकडून वेळोवेळी तीन लाख रुपये आणि अडीच तोळ्यांचे सोन्याचे दागिने घेतले. तरुणीने दिलेले पैसे आणि दागिने परत मागितले. त्यावर काटकरने तिला चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com