पुण्यातील शिवसैनिकांचा टिळक चौकात जल्लोष  (video)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्याच्या पूर्वसंध्येला शिवसैनिकांनी एकत्र येत टिळक चौक (अलका टॉकीज) येथे गुरुवारी जल्लोष केला.

पुणे - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्याच्या पूर्वसंध्येला शिवसैनिकांनी एकत्र येत टिळक चौक (अलका टॉकीज) येथे काल जल्लोष केला. लाडूंचे वाटप, फटाक्‍यांची आतषबाजी, "शिवसेना झिंदाबाद'च्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आज (गुरुवारी) शपथ घेणार आहेत. ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती राज्याच्या सर्वोच्च स्थानी बसणार आहे. याचा आनंद साजरा करण्यासाठी अलका चौक येथे शिवसैनिक एकत्र जमले होते. या वेळी शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांचा जयजयकार केला. तसेच भगव्या रंगाची उधळण करीत "कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला' अशा घोषणा दिल्या. बॅंडच्या तालावर शिवसैनिकांनी ठेका धरला. 

या वेळी शहप्रमुख संजय मोरे, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, चंद्रकांत मोकाटे, पृथ्वीराज सुतार, विशाल धनवडे, नाना भानगिरे, बाळा ओसवाल, संजय भोसले, प्राची अल्हाट, पल्लवी जावळे, संगीता ठोसर, प्रशांत बधे, श्‍याम देशपांडे, शिरीष आपटे, नितीन शिंदे, गजानन थरकुडे, योगेश मोकाटे, आनंद मंजाळकर, निरंजन दाभेकर, नितीन पवार, शहर संघटिका सविता मते, निर्मला केंढे, राधिका हरिश्‍चंद्रे, स्वाती ढमाले, रोहिणी कोल्हाळ, सुदर्शना त्रिगुणाईत यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रूपाने उद्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. यामुळे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होत आहे. नवे सरकार शेतकरी, बेरोजगार यांच्यासह सर्व समाजघटकांना न्याय देईल. 
- संजय मोरे, शहरप्रमुख, शिवसेना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Shivsainik celebrating at alka chowk