डिजिटल शहर म्हणून पुण्याची ओळख व्हावी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

पुणे : नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासोबतच विकासप्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी महापालिकेकडून डिजिटल तंत्रज्ञानावर भर देण्यात येत आहे. डिजिटल शहर म्हणून पुण्याची ओळख निर्माण व्हावी, यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहन महापौर मुक्‍ता टिळक यांनी केले. 

बालगंधर्व रंगमंदिरात शुक्रवारी पुणे महापालिकेच्या पीएमसी केअर - 2, जीआयएस आणि ई-लर्निंग प्रकल्पाच्या उद्‌घाटनप्रसंगी महापौर टिळक बोलत होत्या. पालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, आयुक्‍त कुणाल कुमार, अतिरिक्‍त आयुक्‍त राजेंद्र निंबाळकर, शीतल उगले, नगरसेवक दिलीप वेडे पाटील, नीलिमा खाडे, मंजूश्री खर्डेकर आदी या वेळी उपस्थित होते. 

महापौर टिळक म्हणाल्या, ''प्रशासन नागरी सुविधांबाबत नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहे. पीएमसी केअर आणि जीआयएस सुविधांमुळे नागरिक आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद स्थापित होईल.'' प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण वेळीच करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्‍त केली. 

आयुक्‍त कुणाल कुमार म्हणाले, ''शहराच्या विकासाचे निर्णय घेताना नागरिकांना प्रत्यक्ष सहभागी करून विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नवीन योजना, प्रकल्प सुरू करण्यापूर्वी नागरिकांची मते जाणून योजना आखण्यात येतील. 'पुणे कनेक्‍ट' या ऍपच्या माध्यमातून नागरिकांना पालिका प्रशासनाकडे तक्रारी नोंदविण्यासोबतच संवाद साधता येईल. सुरेश परदेशी यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Pune should be the digital city says Mukta Tilak