पुणे ‘स्मार्ट सिटी'ची कामे कागदावरच ‘स्मार्ट’

संभाजी पाटील, मंगेश कोळपकर
Thursday, 15 October 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असणाऱ्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पास चार वर्षे पूर्ण झाली. पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील सद्यःस्थितीचा नुकताच आढावा घेतला. त्यांच्यासह लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पाच्या असमाधानकारक कामांबद्दल आगपाखड केली. या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ने प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला; त्यात अनेक कामे कागदावरच ‘स्मार्ट’ असल्याचे वास्तव समोर आले. परिणामी, स्मार्ट सिटी प्रकल्पाचा शहरविकासावर प्रभाव जाणवत नसल्याची जनभावना आहे. नेमके काय झाले, याचे हे सविस्तर चित्र... 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असणाऱ्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पास चार वर्षे पूर्ण झाली. पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील सद्यःस्थितीचा नुकताच आढावा घेतला. त्यांच्यासह लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पाच्या असमाधानकारक कामांबद्दल आगपाखड केली. या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ने प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला; त्यात अनेक कामे कागदावरच ‘स्मार्ट’ असल्याचे वास्तव समोर आले. परिणामी, स्मार्ट सिटी प्रकल्पाचा शहरविकासावर प्रभाव जाणवत नसल्याची जनभावना आहे. नेमके काय झाले, याचे हे सविस्तर चित्र... 

 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 

नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर ‘जेएनएनयूआरएम’ या योजनेला पर्याय देत मोठ्या शहरांसाठी त्यांनी ‘स्मार्ट सिटी मिशन’ हा त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जाहीर केला. पहिल्या टप्प्यात देशातील वीस शहरांची स्पर्धात्मक निवड झाली. त्यात देशात पुण्याची दुसऱ्या क्रमांकाने निवड झाली. पुण्याच्या गरजा लक्षात घेऊन शहराचा स्मार्ट आराखडा तयार करण्यासाठी आणि लोकसहभाग मिळावा, यासाठी ‘सकाळ’ने मोहीम राबविली. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते स्मार्ट सिटी योजनेचे राष्ट्रीय उद्‌घाटन २५जून २०१६ रोजी पुण्यात झाले. त्यामुळे हा प्रकल्प पुण्यात सर्वांत गतिमान पद्धतीने राबविला जाईल आणि देशपातळीवर तो आदर्श बनेल, अशी अपेक्षा होती. औंध-बालेवाडी-बाणेर (एबीबी) या स्थानिक क्षेत्रासाठी ३ हजार १७० कोटी आणि शहरपातळीवर (पॅनसिटी) १ हजार ५९७ कोटी रुपये असा सुमारे पाच हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र, गेल्या चार वर्षांत यातील केवळ चारशे कोटी रुपयांचे प्रकल्प पूर्ण झाले. स्मार्ट सिटीने गेल्या दीड वर्षात १२५ प्रकल्पांच्या निविदा तयार केल्या. परंतु, त्यातील ४० प्रकल्पांवर प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित ८५ प्रकल्पांच्या निविदांवर अद्याप प्रक्रिया झालेली नाही.

आरंभशूर!
स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यात धडाक्‍यात काम सुरू झाले. लाइट हाउस, हॅपी स्ट्रीट, प्लेस मेकिंग (थीम गार्डन), बायसिकल शेअरिंग, हेल्थ क्‍लिनिक, पीएमसी केअर ॲप, हॅकेथॉन-आयडियाथॉन, कमांड अँड कंट्रोल सेंटर या प्रकल्पांना राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिके मिळाली. देशातील अनेक स्मार्ट सिटीच्या शहरांमधील लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी पुण्याची पाहणी करून येथून धडे गिरविले. परंतु, हे सातत्य कायम राहिले नाही. गेल्या दोन वर्षांत सुरत, अमरावती (आंध्र प्रदेश), इंदूर, भोपाळ, काकीनाडा या पुण्यापेक्षा लहान शहरांनीही चेन्नई, बंगळूरसह पाचशे कोटींपेक्षा जास्त निधीचा विनियोग केला. राज्यात पुणे पहिल्या क्रमांकावर असले, तरी पुण्याची अशी अवस्था असेल, तर या प्रकल्पातील राज्याच्या इतर शहरांची काय परिस्थिती असेल? 

एका किलोमीटरसाठी १९ कोटी रुपये खर्च 
औंधमधील १.५ किलोमीटरचा डीपी रोड स्मार्ट सिटी कंपनीने विकसित केला. त्यासाठी सुमारे १९ कोटी रुपये खर्च आला आहे. बालेवाडीतील १६ किलोमीटरचा रस्ता तयार करण्यासाठी १५३ कोटी, बाणेरमधील ७.५ किलोमीटरचा रस्ता विकसित करण्यासाठी ३८ कोटी, तर औंधमधील ४.२ किलोमीटरचा स्मार्ट स्ट्रीट तयार करण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनी ३३ कोटी रुपये खर्च करीत आहे. 

Pune Rain Updates : सहकारनगर, धनकवडीत पावसाचा हाहाकार; 227 मिलीमीटर पावसाची नोंद  

स्मार्ट सिटी अंमलबजावणीतील अडथळे 

 • स्मार्ट सिटी-महापालिकेत समन्वयाचा अभाव. 
 • स्मार्ट सिटीला प्रकल्प करताना महापालिकेची परवानगी, भूसंपादन यामध्ये होणारी दिरंगाई. 
 • आयसीसी टॉवरमध्ये इन्क्‍युबेशन सेंटर उभारायचे होते. त्यासाठी निविदा निघाल्या. परंतु, ही जागा महापालिकेने भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. 
 • स्मार्ट सिटीने महापालिकेच्या जागांवरील प्रकल्प पूर्ण करून पुन्हा महापालिकेकडे हस्तांतरित केले आहेत. परंतु, महापालिकेकडून त्यांचे पुढे नेमके नियोजन होत नसल्यामुळे प्रकल्पावरील खर्चाचे भवितव्य अधांतरी राहते. 
 • कोणते प्रकल्प राबवायचे, याची महापालिका-स्मार्ट सिटीची संयुक्त समिती आहे. परंतु, त्यांच्या बैठकांचे वेळापत्रक अनेकदा अनिश्‍चित असते. 

कर्जासाठी आवश्‍यक प्रक्रिया पूर्ण करूनही मिळाले नाही कर्ज; काय आहे प्रकार वाचा

दिरंगाई, निष्काळजीपणा 
ॲग्युमेंटेड पार्क, सीनिअर सिटिझन पार्क, रोलबॉल स्केटिंग पार्क, सायन्स पार्क हे प्रकल्प गेल्या वर्षी फेब्रुवारीपर्यंतच पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यासाठी निधीही उपलब्ध होता. परंतु, ते अद्याप पूर्ण झालेले नाहीत. रोलबॉल स्केटिंग पार्कमध्ये बांधकाम अर्धवट झाले आहे. त्या बांधकामात आता झाडे उगवली आहेत, तर बुकझानिया पार्क तयार झाले. मात्र, त्याचा वापर सुरू होण्यापूर्वीच त्यांची देखभाल दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे. अन्य रखडलेल्या प्रकल्पांनाही आता कोरोनाचे निमित्त मिळाल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले. 

स्मार्ट लपवा-छपवी 
स्मार्ट सिटीच्या रॅकिंगमध्ये ऑगस्ट महिन्यात पुणे २५व्या क्रमांकावर पोचले. त्यानंतर स्मार्ट सिटी कंपनीने तत्परतेने हालचाल केली व केंद्र सरकारला कामांचे तपशील पुरविले. त्यानंतर ८ दिवसांतच पुण्याचे रॅकिंग १५व्या क्रमांकावर पोचले. स्मार्ट सिटीने ६०० पैकी ४२१ कोटी रुपये गेल्या चार वर्षांत खर्च केलेत. त्याचे तपशील मात्र नागरिकांपासून लपविण्यात आले.

सद्य:स्थिती 

 • आयटी - स्मार्ट स्कूल, डिजिटल एज्युकेशन सिस्टीम, हेल्थ मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टीम, सिटी सर्व्हेलन्स सिस्टीम हे प्रकल्प काही अंशी पूर्ण 
 • मोबिलिटी - ॲडेप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (एटीएमएस) अद्याप निविदांच्या प्रक्रियेतच. ई-रिक्षा, स्मार्ट पार्किंग, ट्रॅफिक मास्टर प्लॅन हे प्रकल्प अद्याप अपूर्ण 
 • स्मार्ट स्ट्रीट - औंध ८ किलोमीटर, बाणेर १७ किलोमीटर, बालेवाडी १६. ५ किलोमीटर, औंध-बाणेर-बालेवाडी एकूण ७२ किलोमीटर लांबीचे रस्ते विकसित करण्याची कामे सुरू तर, रोड पेंटिंग व मार्किंग, स्ट्रीट फर्निचर, रोड ॲसेटस मॅनेजमेंट सिस्टीम, अंडरग्राऊंड युटिलीटी मॅनेजमेंट सिस्टीम आदी कामे अद्याप अपूर्ण. 
 • प्लेसमेकिंग - २२ ठिकाणी - सायन्स पार्क, रोल- बॉल स्केटिंग, सेंटर ऑफ एक्‍सलन्स फॉर आर्ट, एन्व्हार्यमेंट पार्क, डिफेन्स पार्क, ॲडव्हेंचर गार्डन, सिनिअर सिटिझन पार्क, फिटनेस पार्क, किड्‌स - पेटस पार्क, बांबू गार्डन, वॉटर कॉन्झर्वेशन पार्क, फ्रॅगमेंटेड रिऍलिटी पार्क यांची कामे अपूर्ण. 
 • फायर ब्रिगेड स्टेशन, ट्रॅफिक एज्युकेशन पार्क, स्मार्ट टॉयलेट यांचीही कामे अपूर्ण. 
 • आठ पोलिस ठाण्यांत सिटिझन फॅसिलिटी सेंटर उभारण्याचे काम सुरू. 
 • महापालिका आणि पुणे सिटी कनेक्‍टच्या मदतीने सात ठिकाणी लाइट हाऊस सुरू.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Smart City Work Issue Ajit Pawar