धक्कादायक! पुण्यात १४ दिवसांत एवढ्या जणांनी संपविले जीवन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

सर्वाधिक तरुणच
आत्महत्या करणाऱ्यांमध्ये उत्पादनक्षम वयातील तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. २० पेक्षा कमी वयाच्या तिघांनी आत्महत्या केली आहे. त्यात दोन मुली व एका मुलाचा समावेश आहे. २१ ते ३० वयोगटात आत्महत्येचे प्रमाण पाच आहे. त्यात चार पुरुष आणि एक महिला आहे. उत्पादनक्षम वयोगट असलेल्या ३१ ते ५० मध्ये सर्वाधिक म्हणजे ११ जणांनी आत्महत्या केली. त्यातही स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण जास्त आहे. ५१ ते ६० व ६१ पेक्षा जास्त वय असणाऱ्या आठ जणांनी केलेल्या आत्महत्येत एका महिलेचा समावेश आहे.

पुणे - शहर आणि परिसरात चौदा दिवसांमध्ये २८ जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यातील ११ जण कमावत्या म्हणजे ३१ ते ५० वर्षे वयातील असल्याची माहिती पुढे आली आहे. ससून रुग्णालयात १५ ते २९ मे या काळात आत्महत्या केलेल्यांचे मृतदेह विच्छेदनासाठी आल्यावर त्याच्या विश्‍लेषणातून हे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपर्यंत सरासरी दर दिवशी एक गळफास घेऊन आत्महत्या केलेले शव विच्छेदनासाठी येत असे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा 

वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्या करणाऱ्यांमध्ये ७९ टक्के (२२) पुरुष आहेत. ११ ते २० आणि ३१ ते ५० वर्षे वयोगटातील प्रत्येकी दोन जणींनी गळफास घेतला. त्यामुळे महिलांचे प्रमाण २१ टक्के (६) इतके आहे. वयाची साठी ओलांडलेल्या सहा जणांनी आत्महत्या केली. त्यात सर्व पुरुष आहेत.

कोथरूडमध्ये जास्त प्रमाण
ससून रुग्णालयात शवविच्छेदन झालेल्या २८ पैकी पाच मृतदेह जिल्ह्यातील होते. त्यात लोणीकंद येथील तीन, लोणी काळभोर आणि ग्रामीण भागातील प्रत्येकी एक मृतदेह होता. उर्वरित २३ आत्महत्यांच्या घटना शहरातील असून त्यात सिंहगड रस्त्यावर चार आणि कोथरूड, मुंढवा भागातील तिघांचा समावेश आहे.

पुणेकरांनो लॉकाडाउन वाढला; पण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन शक्य आहे!

आत्महत्येचे कारण

  • प्रेमभंग
  • वेगवेगळ्या परिस्थितीमुळे आलेले नैराश्‍य 
  • भविष्यात भेडसवणाऱ्या संकटाची भीती 
  • घरातील भांडणे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pune so many people lost their lives in 14 days