पुणे स्थायी समिती अध्यक्षपदाची शुक्रवारी निवडणूक

Pune-Municipal
Pune-Municipal

भाजपकडून रासने, महाविकास आघाडीकडून पठारे यांचे अर्ज
पुणे - पुणे महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी येत्या ६ मार्च रोजी निवडणूक होत आहे. या पदासाठी सत्ताधारी भाजपने समितीचे विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांना पुन्हा संधी दिली आहे. समितीतील पक्षीय बल पाहता रासने यांची निवड होण्याची औपचारिकता राहिली आहे. महाविकास आघाडीकडून नगरसेवक महेंद्र पठारे यांना संधी दिली गेली आहे.

माजी स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे हे आमदार झाल्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. अध्यक्षपदाचा एकवर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच कांबळे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या जागी नगरसेवक रासने यांची वर्णी लागली. तीन महिने रासने यांनी या पदावर काम केले. दरम्यान, अध्यक्षपदाचा एक वर्षाचा कालावधी संपल्याने ही निवडणूक होत आहे. रासने, पठारे यांनी नगरसचिव सुनील पारखी यांच्याकडे अर्ज दाखल केले आहेत. पीएमपीएलच्या नयना गुंडे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.  

स्थायी समितीमध्ये भाजपचे दहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार तर काँग्रेस व शिवसेनेचा प्रत्येकी एक सदस्य आहे. स्थायी समितीतून नुकतेच भाजपचे चार तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि शिवसेना व काँग्रेसच्या प्रत्येकी एका सदस्याची मुदत संपली आहे. त्या जागांवर नवीन आठ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com