"पुणे स्टार्टअप फेस्ट" २०२१ चे उद्या ऑनलाईन उदघाटन; पुणे सीओईपी कडून यंदा ऑनलाईन आयोजन

Pune start up fest will begin from 27 February 2021 arranged COEP College
Pune start up fest will begin from 27 February 2021 arranged COEP College

पुणे :  कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग , पुणे मधील भाऊज आंत्रप्रिनरशिप (बीईसी-सीओईपी) विभागाच्या वतीने "पुणे स्टार्टअप फेस्ट - २०२१" (पीएसएफ) चे ऑनलाईन आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी कोरोनाच्या पार्शवभूमीवर "पुणे स्टार्टअप फेस्ट - २०२१" पहिला ऑनलाईन फेस्ट 27 आणि 28 फेब्रुवारीला " बोल्स्टरिंग इनोवेशन - ब्ल्यू प्रिंट फॉर द फ्युचर" या कल्पनेसह संपन्न होत आहे. या फेस्टचे उद्घाटन  शनिवार (ता) 27 फेब्रुवारी रोजी, सकाळी 09:30 वाजता मॅरीको लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष हर्ष मारिवाला आणि सकाळ माध्यम समूहाच्या संचालिका मृणाल पवार यांच्या हस्ते ऑनलाईन होणार आहे.

विद्यार्थी वर्गामध्ये उद्योग व उद्योजकतेविषयी आवड निर्माण करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना स्टार्टअप इकोसिस्टिमचा परिचय करून देण्यासाठी बीईसी-सीओईपी कडून दरवर्षी २०१९ पासून "पीएसएफ" चे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांद्वारे आयोजित करण्यात येणारा व विविध विद्याशाखांच्या तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभलेला "पुणे स्टार्टअप फेस्ट" (पीएसएफ) हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्टार्टअप फेस्ट आहे.

"पुणे स्टार्टअप फेस्ट" (पीएसएफ) हा एक प्रकारचा स्टार्टअप एक्सपो आहे, ज्याद्वारे आर्थिक तज्ञ, ट्यूटर - अभ्यासक , अंडरस्ट्डिज आणि नवोदित व्यावसायिक अशा विविध लोकांना एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न केला जातो. या फेस्ट अंतर्गत नवोदित स्टार्टअप्सना विविध प्रकारे निधी मिळविण्यासाठी आणि मार्गदर्शनाची संधी दिली जाते. तसेच विद्यार्थ्यांना स्टार्टअप्स मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी दिली जाते.

पुणे स्टार्टअप फेस्ट सीओईपीचे संचालक प्रा. बी. बी. आहुजा, यांच्या नेतृत्वाखाली तिसरा फेस्ट आयोजित करीत आहे. "पीएसएफ" कडे 125 हुन अधिक नवीन स्टार्टअप्स, जवळपास 85 हुन अधिक गुंतवणूकदार व मार्गदर्शक यांच्यासह 18 हजाराहून अधिक साक्षीदार असलेली दुसऱ्या फेस्टची यादी असून , पीएसएफ 2020  फेस्टच्या इतर ठळक गोष्टींमध्ये 500 हुन अधिक जास्त इंटर्नशिपच्या संधी, उद्योजकीय जगातील नामांकित व्यक्तींचे मुख्य भाषण आणि गुंतवणूकीचा समावेश आहे. पुणे स्टार्टअप फेस्ट - 2021 साठी स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया , शिक्षण मंत्रालय - इनोवेशन सेल आणि "सकाळ माध्यम समूह" आदी संस्थांचे सहकार्य लाभले आहे.

"पुणे स्टार्टअप फेस्ट " 2021 द्वारे 100 पेक्षा अधिक स्टार्टअप्स, 55 पेक्षा अधिक गुंतवणूकदार, मार्गदर्शक, विद्यार्थी आणि लोक एकत्र येत आहेत. "पीएसएफ" 21 च्या आकर्षणाचे केंद्र म्हणजे स्टार्टअप एक्स्पो ज्यामध्ये तांत्रिक, सामाजिक, आरोग्य , जीवनशैली, विद्यार्थी, शेती, नाविन्य, आणि आपत्ती व्यवस्थापन नावाचा विशेष झोन मिळून सात झोन आहेत.

मुख्य आकर्षण - हर्ष मारिवाला यांची मुलाखत 

या फेस्टच्या उदघाटन प्रसंगी सकाळ माध्यम समूहाच्या संचालिका मृणाल पवार या मॅरीको लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष हर्ष मारिवाला यांची थेट मुलाखत घेणार आहेत. या मुलाखतीच्या माध्यमातून हर्ष मारिवाला यांनी आपल्या कुटुंबाच्या पारंपारिक व्यवसायात काळानुसार कसा बदल केला आणि व्यवसाय जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत कसा पोहोचला याविषयी हर्ष मारिवाला यांचा थोडक्यात जीवनप्रवास विद्यार्थ्यांपर्यंत मांडण्यात येणार आहे.

सकाळ माध्यम समूहाचा असा विश्वास आहे की, आज माध्यमांची भूमिका ही सामाजिक परिवर्तन करून सुविधा देणारी यंत्रणा किंवा सामाजिक परिवर्तनाचा दुवा म्हणून असली पाहिजे. याकरीता सकाळ माध्यम समूहाने लोकशाहीचे चारही स्तंभ एकत्र करून सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनांच्या दिशेने एकत्र काम करण्याची जबाबदारी घेतली आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्टार्टअप संस्कृती वाढवणे आणि त्यांना जॉब क्रिएटर बनण्यास मदत करणे हा सकाळ माध्यम समूहाचा आणखी एक विचारप्रवाह आहे.

मृणाल पवार - संचालिका - सकाळ माध्यम समूह

पुणे स्टार्टअप फेस्ट २०२१ उदघाटन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खालील लिंक ओपन करून किंवा सोबत दिलेला QR कोड स्कॅन करून सहभागी होऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com