पुणे स्टार्टअप फेस्ट २० चे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

अधिक माहितीसाठी येथे करा संपर्क
पुणे स्टार्टअप फेस्ट २०मध्ये स्टार्टअप म्हणून सहभागी होऊन उपलब्ध संधीचा लाभ मिळविण्यासाठी लवकरात लवकर स्टॉल बुक करा. अधिक माहितीसाठी श्रेयस सोनार - ९०२८२०७८८८ किंवा सर्वेश सिरस - ९४०५३९१२६५ यांना संपर्क करा किंवा पुणे स्टार्टअपच्या संकेतस्थळाला (https://www.punestartupfest.in/index.html ) भेट द्या. इंटर्नशिप मिळविण्यासाठी उत्सुक विद्यार्थी संकेतस्थळाला भेट देऊन टाऊनस्क्रिप्टवर रजिस्ट्रेशन करू शकतात.

पुणे - 'सीओईपी’कडून पुणे स्टार्टअप फेस्ट २०चे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत नवउद्योजक आणि स्टार्टअपना आपल्या कल्पना अनेक गुंतवणूकदार, मार्गदर्शक तसेच जनसामान्यांसमोर मांडण्याची संधी मिळणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डॉ. माधुरी कर्णिक व राहुल आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या पुणे स्टार्टअपच्या पहिल्या आवृत्तीला चांगला प्रतिसाद मिळाला. यंदाही ‘सीओईपी’ने १५ आणि १६ फेब्रुवारी २०२० रोजा पुणे स्टार्टअप फेस्ट २० या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन केले आहे. द्वितीय आवृत्तीचे आयोजन करताना १३०+ स्टार्टअप टेक्‍निकल झोन, स्टुडंट झोन, सोशल झोन, ॲग्रिकल्चर झोन, लाइफस्टाईल झोन व इनोव्हेशन झोन या विभागांमध्ये विभागले जातील. यशस्वी उद्योजक होऊ पाहणाऱ्या ‘आयपीआर’ किंवा पेटंट असलेल्या महत्त्वाकांक्षी कल्पना सादर करण्यासाठी ‘इनोव्हेशन झोन’ हा विशेष विभागही यंदा सहभागी करण्यात आला आहे. १०० हून अधिक गुंतवणूकदार व मार्गदर्शक तसेच उद्योजकता क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्त्वांच्या व्याख्यानमाला हे पुणे स्टार्टअप फेस्ट २०चे मुख्य आकर्षण आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune startup fest 20 Organizing by COEP