‘सीओईपी’त उद्यापासून पुणे स्टार्टअप फेस्ट

Pune Startup fest
Pune Startup fest

पुणे - कर्करोगासारख्या जीवघेण्या रोगावर लवकर आणि वेळेत उपचार होण्यासाठी तत्परतेने सेवा पोचविणारे ‘फास्टसेन्स स्टार्टअप’...देणगीची रक्कम गरजूंपर्यंत पोचावी म्हणून विकसित केलेले ‘केअर डॅडी ॲप’ अशा प्रकारचे लोकांसाठी उपयुक्त ठरणारे स्टार्टअप्स पाहण्याची संधी ‘पुणे स्टार्टअप फेस्ट’मध्ये मिळणार आहे.

शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) भाऊ ई-सेलच्या वतीने महाविद्यालयात आयोजित ‘पुणे स्टार्टअप फेस्ट’मध्ये जवळपास १०० स्टार्टअपचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. हा महोत्सव येत्या शनिवारी (ता. २३) आणि रविवारी (ता. २४) आयोजित केला आहे. महोत्सवातील प्रदर्शनाला ‘स्टार्टअप एक्‍स्पो’ असे नाव देण्यात आले आहे. हे प्रदर्शन तंत्रज्ञान, सामाजिक, कृषी आणि जीवनशैली अशा चार विभागात पाहता येईल. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.

नायट्रो ई-बाइक
प्रदूषण रोखण्यासाठी तसेच जागा आणि पैसा वाचविण्यासाठी १४ वर्षीय नीतेश जैन याने ‘नायट्रो ई-बाइक’चा शोध लावला आहे. त्याने कमी वजनाची आणि दुमडता येणारी इलेक्‍ट्रिक गाडी तयार केली आहे. कारखान्यांमध्ये आणि जड वाहतूक गाड्यांमध्ये वापरला जाणारा हायड्रोजन वायू ‘अल्टरनेट एनर्जी’ या स्टार्टअपद्वारे कमी किमतीत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com