Startup : जुन्या दुचाकी खरेदीतील फसगत टाळण्यासाठी केले स्टार्टअपच सुरू

जुनी दुचाकी विकत घेण्यासाठी गेल्यानंतर तिची योग्य प्रकारे तपासणी करणे प्रत्येकालाच शक्य होत नाही. त्यामुळे त्या व्यवहारात फसवणूक झाल्याचा अनुभव अनेकांना आला आहे.
Old vehicle
Old vehiclesakal

पुणे - जुनी दुचाकी विकत घेण्यासाठी गेल्यानंतर तिची योग्य प्रकारे तपासणी करणे प्रत्येकालाच शक्य होत नाही. त्यामुळे त्या व्यवहारात फसवणूक झाल्याचा अनुभव अनेकांना आला आहे. दुचाकी चांगली निघाली तरी ती घेताना नव्या गाडीप्रमाणे सुविधा मिळतीलच असे नाही. देशात दरवर्षी अशा लाखो दुचाकींचा व्यवहार होत असतो. त्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल देखील होते. मात्र, या व्यवहारात फसवणूक होवू शकते.

तसेच दुचाकी विकत घेतल्यानंतर ती विकणारा व्यावसायिक ग्राहकांचे काहीच ऐकून घेत नसल्याचे प्रकार घडतात. हाच अनुभव आलेल्या एका तरुणाने या सर्वांना कंटाळून स्वतःच या समस्येचे निराकरण केले. जुनी दुचाकी विक्रीच्या व्यवसायात विश्वास, पारदर्शकता आणि सुविधेवर लक्ष केंद्रित करून निखिल जैन यांनी ‘क्रेडआर’ हे स्टार्टअपच सुरू केले आहे.

अल्पावधीतच हे प्लॅटफॉर्म वापरलेल्या दुचाकी बाजारपेठेतील देशातील एक अग्रगण्य व्यासपीठ ठरले आहे. या प्लॅटफॉर्मने तीन लाखांहून अधिक ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. ज्यात हजारो दुचाकीधारक, स्थानिक डीलर्स आणि स्टार्टअपच्या सेवांचा वापर करणारे एजंट यांचा समावेश आहे. निखिल हे मुळचे जळगावमधील असून त्यांचे वडील फार्मास्युटिकल व्यवसाय करतात. जैन यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मुंबई येथून शिक्षण घेतले आहे. जिथे त्यांनी अभियांत्रिकी भौतिकशास्त्राचा अभ्यास केला. निखिल यांचे स्टार्टअप सध्या पुणे, बंगळूर, दिल्ली आणि मुंबईत कार्यरत आहे.

Old vehicle
Pune Crime : ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाऊ आणि पुतण्याला सात वर्षे सक्तमजुरी

जुनी दुचाकी विक्रीची मोठी बाजारपेठ देशात आहे. मात्र, त्यात विश्‍वासहार्यता आणि पारदर्शकता नसल्याचे दिसते. त्यामुळे मी याबाबत सेवा पुरविणारे अद्ययावत स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला. दुचाकीच्या व्यवहारात माझी देखील फसवणूक झाली होती. कोणतीही गाडी विकताना आम्ही ठरवलेल्या किमतीबाबत चर्चा करीत नाहीत. मात्र, काही समस्या निर्माण झाल्यास आम्ही गाडी पुन्हा खरेदी करतो.

- निखिल जैन, संस्थापक, क्रेडआर

स्टार्टअपची वैशिष्ट्ये

  • विकलेली दुचाकी परत घेण्याचा पर्याय

  • सोपी, व्यवहारिक आणि विश्‍वासहार्य प्रक्रीया

  • नवीन गाडीप्रमाणे सर्व सुविधा दिल्या जातात

  • दुचाकी विक्रीच्या प्रक्रियेत माणसाचा हस्तक्षेप नाही

  • हस्तांतराची प्रक्रीया सोपे करते

Old vehicle
Tree Cutting : सर्व मान्यता मिळाल्यानंतरच होणार वृक्षतोड

अशी टाळा फसवणूक

या प्लॅटफॉर्मवर अपलोड केलेल्या वाहनांची तपासणी करण्यात येते. दुचाकीमध्ये कोणता बिघाड असल्यास तो दुरुस्त केला जातो. तसेच त्याची माहिती दुचाकी विकत घेणाऱ्याला दिली जाते. त्यामुळे ग्राहकाची फसवणूक होत नाही. तसेच गाडी घेतल्यानंतर लगेच ग्राहकाला दुचाकीवर कोणता खर्च करावा लागत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com