शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

non teaching staff strike

विविध प्रलंबीत मागण्यांसाठी राज्यभरातील अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे लाक्षणिक काम बंद आंदोलन केले.

Teacher Agitation : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

पुणे - विविध प्रलंबीत मागण्यांसाठी राज्यभरातील अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे लाक्षणिक काम बंद आंदोलन केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि बहुतेक संलग्न महाविद्यालयांतील कर्मचाऱ्यांनी आज काम बंद ठेवले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर लेखी आश्वासन दिले जावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाने गुरुवारी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला होता. सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना, ५८ महिन्याची थकबाकी, एक हजार ४१० कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, या मागण्या करण्यात आल्या आहेत. काम बंद आंदोलनामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षांना फटका बसला आहे.

मागण्या लेखी स्वरूपात मान्य होत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचा पवित्रा घेतला आहे. राज्यातील अकृषी विद्यापीठे त्यासोबतच महाविद्यालयांमध्ये शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने आज एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर गेले. अजूनही लेखी आश्वासन न मिळाल्यामुळे नियोजित पद्धतीने आंदोलन पुढे चालू राहणार आहे.

शहरात कामबंद आंदोलनाला सर्वच महाविद्यालयांनी पाठिंबा दिला. अजूनही सरकारकडून लेखी आश्वासन आलेले नाही. त्यामुळे सोमवार (ता.२०) पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे.

- डॉ. सुनील धिवार, उपाध्यक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षकेतर सेवक कृती समिती

टॅग्स :puneteacherStrike