Pune : एकाच दिवशी अठराशे विद्यार्थीनींना मोफत सॅनिटरी पॅड वाटप

राज्य महिला आयोगाचा खडकवासला मतदारसंघात उपक्रम
Pune
Punesakal

किरकटवाडी : महाराष्ट्र राज्य महिला आयोग व क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान धायरी यांच्या संयुक्त विद्यमाने खडकवासला विधानसभा मतदारसंघातील विविध विद्यालयांमध्ये इ. सातवी ते बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या तब्बल अठराशे विद्यार्थीनींना मोफत सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. तसेच गुड टच – बॅड टचचे शिक्षण देणारा उपक्रम राबविण्यात आला. प्रातिनिधिक स्वरूपात हा उपक्रम खडकवासला मतदारसंघात सुरू करण्यात आला असून तो राज्यभर राबविण्यात येणार असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडून सांगण्यात आले.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून विद्यार्थिंनींसाठी ‘सॅनिटरी नॅपकिन बँक – आपल्या आरोग्यासाठी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. यात शालेय तसेच महाविद्यालयीन मुलींना मोफत दरमहा सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात येत आहे. यासाठी शाळा,महाविद्यालये यांच्याशी समन्वय ठेवण्यात येतो. मुलींची नोंदणी करुन त्यांना ओळख पत्र दिले जाते. दर महिन्याला ओळख पत्र दाखवत, नोंद करुन घेत शाळा, महाविद्यालयातच मुलींना सॅनिटरी पॅड मिळते.

आज झालेल्या कार्यक्रमात सॅनिटरी नॅपकीन बॅंकसाठी नोंदणी करण्यासोबतच मुलींना गुड टच – बॅड टचचे शिक्षण देणारी विडियो फिल्मही दाखविण्यात आली. यावेळी डॅाक्टरांच्या टीमकडून मुलींना सॅनिटरी नॅपकिनचा वापर, चांगले आरोग्य राखण्यासाठी काळजी याबाबत ही मार्गदर्शन करण्यात आले. नालंदा विद्यालय धायरी, शिवभूमी विद्यालय खेडशिवापूर, महात्मा गांधी विद्यालय खानापूर, यशवंत विद्यालय खडकवासला, विमलाबाई नेर्लेकर विद्यालय खडकवाडी या पाच शाळांमधे झालेल्या कार्यक्रमात १८०० मुलींची नॅपकीन बॅंकेत नोंदणी करण्यात आली आहे.

"मुलींच्या शिक्षणात, आरोग्यात अडथळे येऊ नयेत यासाठी आयोगाकडून सॅनिटरी नॅपकीन बॅंक उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या बॅंकेत मुलींना दरमहा शाळेतच नॅपकीन्स दिले जातात. शालेय शिक्षण सुरु असतानाच त्यांचे आरोग्य जपण्याचा हा प्रयत्न आहे. स्त्रियांना उपजत स्पर्शाची जाणीव असतेच पण लहान वयातच याबाबत मुलींना जागरुक, सतर्क केल्यास अनेक गोष्टी रोखता येऊ शकतात. मुलींना सुरक्षेच्या दृष्टीने सक्षम करण्याच्या उद्देशाने गुड टच – बॅड टच बाबत विडियो फिल्ममधून शिक्षण देण्यात येत आहे. विविध शाळांमधे मिळणारा उत्स्फुर्त प्रतिसाद आमचा ही उत्साह वाढवणारा आहे.मुलींना शाळेत ये-जा करताना होणारा त्रास रोखण्यासाठी निर्भया पथकाची गस्त वाढविण्याबाबत पोलीस महासंचालकांशी तातडीने पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.” रुपाली चाकणकर, अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य महिला आयोग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com