I Will Vote : 'सकाळ'च्या 'आय विल वोट'ला विद्यार्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

सकाळ माध्यम समूह, राज्य निवडणूक आयोग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी संयुक्तपणे नवमतदार जागृती अभियान राबविले.

पुणे : 'मतदान हा माझा हक्क आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी मी मतदान करणारच,' असे म्हणत आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आपला हक्‍क बजावण्याचा निर्धार केला. मतदान करण्याची शपथ त्यांनी यावेळी घेतली. 

सकाळ माध्यम समूह, राज्य निवडणूक आयोग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी संयुक्तपणे नवमतदार जागृती अभियान राबविले. विद्यापीठातील दत्तो वामन पोतदार संकुलात सकाळी 8 वाजता मोठ्या संख्येने विद्यार्थी जमले. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी त्यांनी शपथ दिली. 'सकाळ'चे संपादक सम्राट फडणीस, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, अभिनेत्री सुवर्णा काळे उपस्थित होते. डॉ. म्हैसेकर आणि डॉ. करमळकर यांनी विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवाहन केले. मोनिका सिंग यांनी अजूनही मतदार नोंदणी सुरू असल्याचे सांगत, नोंदणी करण्यास सांगितले. फडणीस यांनी 'आय विल वोट' या उपक्रमामागील सकाळची भूमिका स्पष्ट केली. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असताना नाही. केवळ 54 टक्‍क्‍यांपर्यंत मतदानाची आकडेवारी पोचते याबाबत विद्यार्थ्यांमध्ये आताच जनजागृती केली, तर पुढे भविष्यात त्यांना मतदान करण्याची सवय लागेल, असे त्यांनी सांगितले.

 

Web Title: pune students spontaneous response to sakals initiative I Will vote