पुणे : सिंहगड घाट रस्त्यावर एकाची गळफास घेऊन आत्महत्या

वाढदिवसाच्या दिवशी दारु का पिलात? अशी विचारणा केल्याने संपविले जीवन
विलास तुकाराम खामकर
विलास तुकाराम खामकर sakal

किरकटवाडी: सिंहगडावर जाणाऱ्या घाट रस्त्यावर गोळेवाडीपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. विलास तुकाराम खामकर (वय 46, रा. आतकरवाडी, घेरा सिंहगड, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही मात्र दारुचे व्यसन व कौटुंबिक वादविवाद यातून सदर व्यक्तीने जीवन संपविल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मयत खामकर हे आतकरवाडीतून जाणाऱ्या सिंहगडाच्या पायवाटेवर लिंबू सरबत विकण्याचा व्यवसाय करायचे.

घेरा सिंहगडचे पोलीस पाटील निलेश चव्हाण यांना सिंहगडाच्या घाट रस्त्यावर एका व्यक्तीने गळफास घेतल्याची माहिती मिळाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व तात्काळ याबाबत हवेली पोलीस ठाण्याला माहिती दिली. प्रभारी अधिकारी तेगबिरसिंह संधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दिपक गायकवाड यांनी घटनास्थळी जाऊन स्थानिकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून हवेली पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत.

सतत म्हणायचा मी जीव देईन.विलास खामकर यांच्या कुटुंबातील व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार ते दारु पिऊन आले की घरात वादविवाद व्हायचे. दरवेळी ते 'मी जीव देईन' अशी धमकी द्यायचे. काल त्यांचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशी दारु का पिलात? अशी विचारणा केल्याने त्यांचे पत्नीशी भांडण झाले. त्या रागातून ते घरातून निघून गेले व गळफास घेऊन आत्महत्या केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com