पुणे : 'एसजीएस' मॉलमध्ये आढळली संशयास्पद वस्तु

sgs
sgs

पुणे : लष्कर परिसरातील 'एसजीएस' मॉलमध्ये बॉम्बसदृश्य संशयित वस्तु आढळल्याची चर्चा पुण्यात सुरु आहे. याबाबत घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून तपास सुरु आहे. 

"एसजीएस मॉलमध्ये मिठाईचे बॉक्स संशयास्पदरित्या आढळले आहेत. त्यामध्ये नेमके काय आहे, याविषयी बिडिडीएसचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे." असे बीडीडीएसचे पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत पोलिस नियंत्रण कक्षाला दुपारी 12 वाजुन 5 मिनिटांनी फोन आला  होता. त्यानुसार बॉम्ब शोधक व नाशक विभागाचे एक पथक घटनास्थळी रवाना झाले असून त्यांच्याकडुन तपासणी सुरु आहे. त्यामुळे मॉलच्या परिसरात लोकांना जाण्यास मनाई करण्यात आली असून घटनास्थळी बंडगार्डन पोलिस दाखल झाले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com