किमान तापमानात चढ- उतार कायम 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

पुणे - उत्तर महाराष्ट्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या दोन दिवसांमध्ये वाढलेला थंडीचा कडाका शुक्रवारी कमी झाला. पुढील आठवड्यात किमान तापमानात चढ- उतार कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. राज्यात सर्वांत कमी तापमान नगर येथे 5.9 अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुण्याचा किमान तापमानाचा पारा चोवीस तासांमध्ये 8 वरून 9.3 अंश सेल्सिअसपर्यंत वाढला. 

उत्तरेकडून महाराष्ट्राच्या दिशेने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमध्ये पुणे आणि नाशिक येथील किमान तापमानाचा पारा गेल्या चोवीस तासांपर्यंत 8 अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरला होता. मात्र, उत्तर भारतात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पारा 1.3 अंश सेल्सिअसने वाढून 9.3 नोंदला गेला. 

बंगालच्या उपसागरात अंदमान- निकोबारजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढील दोन दिवसांमध्ये त्याची तीव्रता वाढण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात किमान तापमानात चढ- उतार राहील, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.

Web Title: pune temperature