पुणे @ 40.7

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

पुणे  - पुण्यात यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमानाची नोंद बुधवारी झाली. सरासरीपेक्षा तीन अंश सेल्सिअसने उसळी मारून कमाल तापमानाचा पारा ४०.७ अंश सेल्सिअसपर्यंत पोचला. पुढील दोन दिवसांत आकाश निरभ्र राहणार असल्याने उन्हाचा चटका कायम राहील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला. लोहगाव येथे कमाल तापमान ४१.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. राज्यात सर्वाधिक तापमान ४६.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
 
Web Title: pune temperature @ 40.7