पुणे - काळेवाडीत टेम्पो चालकाचा खून 

संदीप घिसे 
सोमवार, 16 जुलै 2018

पिंपरी (पुणे) - डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून एका टेम्पो ट्रॅव्हलर चालकाचा खून करण्यात आला. ही घटना काळेवाडी येथे सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता उघडकीस आली.

पिंपरी (पुणे) - डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून एका टेम्पो ट्रॅव्हलर चालकाचा खून करण्यात आला. ही घटना काळेवाडी येथे सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता उघडकीस आली.

अनिल रमेश सुतार (रा. चिंबळी, ता. खेड, जि. पुणे) असे खून झालेल्या चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुतार हे संतोष जाधव (रा. भोसरी) यांच्या सतरा सीटर टेम्पो ट्रॅव्हलर (एमएच १४ - जीडी - ७६०८)  वर चालक म्हणून कामाला होते. ते टेम्पोमध्येच राहात असत. सोमवारी सकाळी टेम्पो भाड्याने पाठवायचा असल्याने जाधव हे चालक सुतार यांना फोन करीत होते. मात्र त्यांचा काही प्रतिसाद न आल्याने ते सुतार यांना पाहण्यासाठी काळेवाडी येथे आले. त्यावेळी सुतार यांच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून सुतार यांचा खून झाल्याचे दिसून आले. जाधव यांनी त्वरित पोलिसांना याबाबत माहिती दिली. वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Pune - Tempo driver murder in Kalewadi