काश्मीरमधील अतिरेकी संघटनाच्या संपर्कात आलेल्या तरुणास पुण्यातून अटक

पुणे दहशतवाद विरोधी पथकाकडून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.
Terrorist Arrested
Terrorist Arrestedsakal media

पुणे : अतिरेकी संघटनाना अर्थपुरवठा (टेरर फंडिंग) करण्याच्या प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) दापोडी येथून एका तरुणाला सोमवारी अटक केली. त्यास मंगळवारी दुपारी तीन वाजता न्यायालयात हजर केले जाणार आहे."लष्कर ए तैयाबा" या संघटनेशी संबंध असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

(Pune Terrorist Connection News Updates)

जुनेद मोहम्मद असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद हा समाजमध्यमाद्वारे काश्मीरमधील "गझवाते अल हिंद" या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला होता. एक महिन्यापूर्वी त्याच्या बँक खात्यात पैसे जमा झाले होते. दरम्यान, तो या संघटनेच्या अधिक संपर्कात येत असल्याची माहिती पुणे "एटीएस"ला मिळाली होती. त्यानुसार,

सोमवारी दुपारपासून त्याची चौकशी सुरू होती. त्यानंतर तो चौकशीत दोषी आढळल्याने त्याच्याविरुद्ध सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यास अटक करण्यात आली. मोहम्मद यास मंगळवारी दुपारी ३ वाजता न्यायालयात हजर केले जाणार आहे.मोहम्मद हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवासी आहे. तो मागील दीड वर्षांपासून पुण्यात राहत होता. त्याचे शिक्षण मदरशात झालेलं आहे.

Terrorist Arrested
कुख्यात डॉन दाऊद कराचीमध्येच; भाचा अलीशाहा पारकरचा दावा

त्या स्फोटककांशी संबंध आहे का, याची तपासणी

पुणे स्टेशन येथे मागील आठवड्यात स्फोटके आढळली होती. त्यानंतर रेल्वे, पुणे पोलिस, एटीएस सह सर्व तपास यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सध्या सुरू आहे, त्यातच एटीएसने दापोडी येथे केलेल्या कारवाईत अटक केलेल्या आरोपीचा या प्रकरणाशी संबंध होता का ? तसेच त्यास पुण्यात काही घातपाती कृत्य करायचे होते का ? याचा तपास एटीएस करत आहे.

पुण्यातून यापूर्वीही "टेरर फंडिंग" प्रकरणी झाली होती एकास अटक

भारतातील दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानमधून येणारा पैसा (टेरर फंडिंग) भारताच्या वेगवेगळ्या भागात पोचविणाऱ्या उत्तर प्रदेशातील टोळीप्रमुख रमेश शहा (वय 28, रा.गोपालगंज, बिहार) यास महाराष्ट्र व उत्तर प्रदेश "एटीएस'ने फेब्रुवारी २०१९ मध्ये पुण्यातून अटक केली होती. पोलिसांच्या भीतीने त्याने उत्तर प्रदेशमधून पलायन करून पुण्यात वास्तव्य केले होते. तो नेटकॉलींगद्वारे दहशतवाद्यांच्या हॅंडलरशी संपर्कात होता. त्यांच्याकडून मिळणारे पैसे तो देशातील विविध राज्यात दहशतवादी कृत्य घडवून आणण्यासाठी पोचवीत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com