माय लेक बुडत होते, वाचवायला गेलेलाही बुडाला; पुण्यातील हृदयद्रावक घटना

टीम ई-सकाळ
मंगळवार, 21 जानेवारी 2020

रोहिणी या तळ्याकाठी कपडे धुत होत्या. या वेळी त्यांचा मुलगा स्वप्नील ही तेथे आला. तेथे खेळताना तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी रोहिणी या पाण्यात उतरल्या.

वाघोली (पुणे) : भैरवनाथ तळ्यात पडलेल्या मायलेकाना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या तरुणासह तीन जण बुडल्याची घटना 2.30 च्या सुमारास घडली. महिला ग्रामपंचायत सफाई कर्मचारी आहे. दोन तासाच्या शोध कार्यानंतर तरुणांचा मृतदेह सापडला. आई व मुलाचे शोध कार्य उशिरापर्यंत सुरू होते. रोहिणी संजय पाटोळे ( वय 35 ) स्वप्नील संजय पाटोळे (वय 12) या मायलेकासह दत्तात्रय रघुनाथ जाधव वय (वय 38) (तिघेही रा. वाघोली) अशी बुडालेल्या तिघांची नावे आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिसानी दिलेल्या माहिती नुसार, रोहिणी या तळ्याकाठी कपडे धुत होत्या. या वेळी त्यांचा मुलगा स्वप्नील ही तेथे आला. तेथे खेळताना तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी रोहिणी या पाण्यात उतरल्या. या वेळी त्यांची मुलगी साक्षी तेथे होती. त्या दोघांना बुडताना पाहून तिने आरडा-ओरड केली. समोरच्या बाजूला कठड्यावर बसलेला दत्ता याने बघितले. त्याने त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, तो ही तळ्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आल्यानंतर बुडाला. तोपर्यंत मायलेकही बुडाले. अन्य दोन तरुणांनीही पाण्यात उतरून वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याची खोली जास्त असल्याने त्यांची दमछाक झाली व ते पुन्हा कठड्यावर आले. घटना कळताच तळ्याकाठी मोठी गर्दी झाली. 

Image may contain: 2 people, closeup

स्वप्नील पाटोळे आणि रोहिणी पाटोळे

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पीएमआरडीएच्या अग्निशमन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी शोध कार्य सुरू केले. चार वाजण्याच्या सुमारास दत्ता याचा मृतदेह हाती लागला. माय लेकाचा शोधकार्य सायंकाळ पर्यंत सुरू होता. रात्रीही शोधकार्य सुरू ठेवणार असल्याचे पीएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यांचे नवीन पथकही दाखल झाले होते. रोहिणी या आज रजेवर होत्या. तर स्वप्नील हा सातव शाळेत सहावीत शिकत होता. त्याच्या दोन्ही बहिणीही शिक्षण घेतात. रोहिणी यांचे पती संजय आजारी असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune three drown near wagholi including mother and her boy