पुणे शहरात आज ढगाळ वातावरण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

पुणे - मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पुढील दोन दिवसांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे सोमवारी वर्तविण्यात आला. पुण्यात मंगळवारी (ता. 10) संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्‍यता आहे. 

पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र ते आग्नेय अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे, तर उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मध्य प्रदेशावर हवेच्या चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत आहे. बुधवारपर्यंत ही स्थिती कायम राहणार असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाची शक्‍यता कायम आहे. ढगाळ हवामानामुळे राज्यात ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा चटका काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भातील कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. 

राज्यात मालेगाव येथे सर्वाधिक म्हणजे 41.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

Web Title: Pune today the cloudy atmosphere