पुणे : विद्यापीठात उद्यापासून रंगणार "युवास्पंदन' महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि नवी दिल्ली येथील असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठामध्ये बुधवार (ता. 19) ते रविवार (ता.20) दरम्यान "युवा स्पंदन' हा आंतरविद्यापीठीय पश्‍चिम विभाग युवक महोत्सव आयोजित केला आहे. 

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि नवी दिल्ली येथील असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठामध्ये बुधवार (ता. 19) ते रविवार (ता.23) दरम्यान "युवा स्पंदन' हा आंतरविद्यापीठीय पश्‍चिम विभाग युवक महोत्सव आयोजित केला आहे. 

यंदा पहिल्यांदाच विद्यापीठाला हा महोत्सव आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि राजस्थान या चार राज्यांतील जवळपास दीड हजार विद्यार्थी कलाकार महोत्सवात सहभागी होणार आहेत. संगीत, नृत्य, नाट्य, ललित कला आणि साहित्य अशा कला सादर होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक अभिरुची अधिकाधिक समृद्ध व्हावी, यासाठी हा उपक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी यांनी दिली आहे.

Web Title: Pune: Tomorrow Yuvaspadan Festival will be Started at the university