वीजमीटरचे रीडिंग पाठविण्यात पुणे अव्वल 

meter.jpg
meter.jpg

निरगुडसर (पुणे) : पुणे प्रादेशिक विभागातील पाच जिल्ह्यांतील 6 लाख 9 हजार 905 लघुदाब वीजग्राहकांनी गेल्या पाच महिन्यांमध्ये स्वतःहून महावितरणकडे मीटर रीडिंग पाठविले आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 4 लाख 45 हजार 300 ग्राहकांचा समावेश असून त्यातील 89 हजार 494 ग्राहकांनी गेल्या ऑगस्ट महिन्यात मीटर रीडिंग पाठविले आहे. वीजमीटरचे रीडिंग स्वतःहून दरमहा पाठविण्यामध्ये पुणे जिल्ह्यातील वीजग्राहक राज्यात आघाडीवर आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या सूचनेनुसार लॉकडाउन कालावधीत वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याची सोय महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आली होती. वीजग्राहकांचा प्रतिसाद पाहून अनलॉकनंतरही ही सोय कायम ठेवण्याची तसेच मीटर रीडिंग पाठविण्याची मुदत वाढवून देण्याचा आदेश राऊत यांनी दिला. त्याप्रमाणे रीडिंग पाठविण्याची मुदत 24 तासांऐवजी आता पाच दिवस करण्यात आली आहे. 
गेल्या एप्रिलमध्ये 74 हजार 590, मे- एक लाख पाच हजार 173, जून- 74 हजार 314, जुलै- एक लाख एक हजार 731 आणि ऑगस्टमध्ये 89 हजार 494 वीजग्राहकांनी स्वतःहून मोबाईल ऍप व महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटद्वारे महावितरणकडे मीटर रीडिंग पाठविले आहे. 


मागील पाच महिन्यांत 
रीडिंग पाठविले ग्राहक 

- पुणे शहर - 235417 
- पिंपरी चिंचवड शहर - 119590 
- पुणे ग्रामीण भागातील 90295 

असे पाठवा रीडिंग 
- महावितरण मोबाईल ऍपमध्ये "सबमीट मीटर रीडिंग' वर क्‍लिक केल्यानंतर मीटर क्रमांक नमूद करावा 
- मीटर रीडिंग घेताना वीजमीटरच्या स्क्रीनवर तारीख व वेळेनंतर रीडिंगची संख्या व केडब्लूएच (kWh) असे दिसल्यानंतरच (केडब्लू किंवा केव्हीए वगळून) फोटो काढावा 
- फोटोनुसार मन्युअली रीडिंग ऍपमध्ये नमूद करावे व सबमीट करावे 
- मोबाईल ऍपमध्ये लॉगीन केल्यानंतर मीटर रीडिंग थेट सबमीट करता येईल 
- गेस्ट म्हणून मीटर रीडिंग सबमीट करताना नोंदणीकृत मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी क्रमांक नमूद करावा लागेल 
- ज्या ग्राहकांना www.mahadiscom.in वेबसाइटवरून फोटो व मीटर रीडिंग अपलोड करायचे आहे त्यांनी ग्राहक क्रमांकासोबत ग्राहक रजिस्ट्रेशन व लॉगीन करणे आवश्‍यक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com