पुणे : पर्यटनही‘न्यू नॉर्मल’!

घरात कंटाळलेल्या नागरिकांची राज्याबाहेर धाव
पर्यटन
पर्यटनsakal

पुणे : कोरोनापश्चात वैद्यकीय आणि प्रशासकीय निर्णयांमुळे अडचणीत आलेले पर्यटन क्षेत्र आता अनिश्चिततेच्या गर्तेतून बाहेर पडू लागले आहे. पर्यटकही देशांतर्गत पर्यटनासाठी इच्छूक असून, त्यासाठी त्यांनी बेत आखण्यास प्रारंभ केला आहे. मात्र, कोरोनासाठीच्या चाचण्या, मास्क, सॅनिटायझर हे नवे मंत्र आता रूजत असून, वैद्यकीय विमा, कमी दिवसांच्या सहली, कमी संख्येचे ग्रुप्स असे विविध बदल स्वीकारत का होईना, पण पर्यटन व्यवसाय पुन्हा उभारू लागला असल्याचे जागतिक पर्यटन दिनाच्या पाश्वर्भूमीवर या क्षेत्रांतील व्यावसायिकांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

गेल्या महिन्यात निर्बंध शिथिल झाल्यामुळे नागरिक पर्यटनासाठी आता बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला काहीसा दिलासा मिळाला आहे. दीपावलीच्या सुट्यांसाठी पर्यटनाचे बेत सुरू झाले आहेत. पर्यटक त्यासाठी पारंपरिक डेस्टिनेशन्सला पसंती देत आहेतच. त्यासमवतेच जम्मू-काश्मीर, लेह-लडाख, राजस्थान, केरळ, मध्य प्रदेश आणि विविध अभयारण्ये आदी ठिकाणांसाठी आरक्षण करू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय पर्यटनाला मात्र, अजूनही अडसर आहे. देशांतर्गत तसेच राज्यांतर्गतही पर्यटनस्थळांबद्दल नागरिक चौकशी करीत आहेत. ग्रुपने जाण्यापेक्षा स्वतंत्र सहलींचेही प्रमाण वाढते असल्याचे पर्यटन व्यावसायिकांचे निरीक्षण आहे. मास्क, सॅनिटायझर, कोरोना चाचण्या आता पर्यटन कंपन्यांच्या पॅकेजमध्येच समाविष्ट झाल्या आहेत. मात्र काही राज्यांत सतत बदलणाऱ्या नियमांमुळे कंपन्यांवरील कामाचा ताण पूर्वीपेक्षा वाढला आहे.

पर्यटन
आधुनिक तंत्रज्ञान अवलंबून फायद्याची शेती करा : प्रविण माने

असे होत आहेत बदल

  • वैद्यकीय सुरक्षिततेबाबत जागरुकता

  • गर्दी टाळण्यासाठी हटके स्थळांना प्राधान्य

  • कमी संख्येचे ग्रुप, स्वतंत्र वाहनांचा वापर

  • कमी दिवसांच्या सहली

  • कंपन्यांवरील कामाच्या ताणात वाढ

  • कर्मचाऱ्यांना अप टू डेट राहण्याची निकड

कोरोना चाचण्यांचे, लसीकरणाचे नियम प्रत्येक देशासाठी आणि राज्यासाठी वेगवेगळे आहेत. त्यामुळे सहलींचे परिपूर्ण नियोजन केले तरी ऐनवेळी नियमात बदल झाल्यावर धावपळ करावी लागते. परिणामी आम्हाला सतत अपडेट राहणे गरजेचे झाले असून, कामाचा ताणदेखील वाढला आहे.

- झेलम चौबळ, केसरी टूर्स

पर्यटन कंपन्यांसह ग्राहकही आता वैद्यकीय सुरक्षेसाठी अधिक जागरुक झाले आहेत. यापूर्वी विमा उतरवण्यासाठी ग्राहक फारसे उत्सुक नसत. मात्र आता चित्र बदलते आहे. कंपन्यांकडूनही कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. कमी दिवसांच्या सहली, कमी संख्येचे ग्रुप, कुटुंबासह सहली असे बदलही आता होत आहेत.

- विवेक गोळे, भाग्यश्री ट्रॅव्हल्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com