Pune Traffic : चांदणी चौकात भीषण वाहतूक कोंडी; रुग्णवाहिकाही अडकून पडल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Traffic

Pune Traffic : चांदणी चौकात भीषण वाहतूक कोंडी; रुग्णवाहिकाही अडकून पडल्या

पुणे - पुण्यात रात्री साडेदहाच्या दरम्यान भीषण वाहतून कोंडी झाल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. रात्री दहा वाजून 35 मिनिटांची चांदणी चौकामध्ये बाणेरच्या बाजूने आलेल्या दोन रूग्णवाहिकांना वाट मिळण्यासाठी हॉर्न वाजवत होत्या. मात्र बराच वेळ रुग्णवाहिकांना मार्ग मिळू शकला नसल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा: Pune : पुलाचे काम, पावसामुळे चांदणी चौक परिसरात वाहतूक कोंडी

चांदणी चौक उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे एक लेन बंद करण्यात आली आहे. मात्र यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीत काही आपत्तीजनक प्रसंग आला, अग्निशमन दलाची गाडी किंवा रुग्णवाहिका जायची असेल तर मार्ग कसा काढणार असा प्रश्न उपस्थित होतोय. वाहतूक नियोजनकर्त्यांकडे याबाबत स्पष्टता नाही. (Pune Traffic news in Marathi)

हेही वाचा: Pune: बालेवाडी, बाणेरकडून चांदणी चौकाच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा

या व्यतिरिक्त शिवाय चांदणी चौक उड्डाणपुलाच्या जवळ ज्या काही व्यावसायिक इमारती, सोसायट्या आहेत तिथे काचेची खिडकी तावदाने आहेत. त्यावर स्फोटाचा काय परिणाम होईल याबद्दल स्थानिकांमध्ये स्पष्टता नाही. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या मनातील शंका दूर करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Pune Newspune traffic