
Pune Traffic : वाहतूक कोंडीच्या विळख्यात धनकवडी
धनकवडी : हातात कितीही जड सामान असो जीवावर उदार होऊन रस्ता असाच ओलांडावा लागतो सातत्याने होणारी वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहतूक, रस्त्यावर कशाही पद्धतीने उभ्या असणाऱ्या रिक्षा वाहतुकीच्या या कोंडाळ्यातून जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडणारे पादचारी असे चित्र उपनगगरातील सर्वाधिक वर्दळीच्या म्हणजेच ग्रामदैवत आई जानुबाई पथमार्गावरील शाहू बँक चौकात दररोज पाहायला मिळत आहे.
मुळात रस्ता अरुंद असल्यामुळे येथे वाहतूक कोंडी अधिक असून त्यात भर अवैध रिक्षाची मुजुरी वाढत असून रिक्षा मध्ये उभे करतात त्यामुळे या भागातील विद्यार्थी, नागरिक शालेय बस पीएमपीएलच्या बस वळताना अडथळा येतो आणि वाहतूक कोंडी होते.
वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने उड्डाणपुलाची निर्मिती करून ही अधिक कालावधी उलटला आहे. त्यानंतर पुन्हा वाहतूक कोंडीच्या विळख्यात धनकवडीतील रस्ता अडकला आहे.
अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स यांमुळे कोंडी होत वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त रिक्षांवर कारवाई करण्यात येत नाही. मात्र, या भीषण वाहतूक कोंडीचा फटका सामान्य पादचारी, नागरिक यांना बसत आहे. प्रवाशांना रस्ता ओलांडून जाताना अडथळा येत असून कोंडीचा सामना करावा लागतो.
पुणे सातारा रस्ता राजर्षी शाहु बँक ते धनकवडी शेवटचा बस स्टॉप या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. तसेच या रस्त्यावर अनेक राष्ट्रीयकृत व सहकारी बँका यांच्या शाखा, शाळा, महाविद्यालये व सरकारी कार्यालये आहेत.
आंबेगाव पठार व धनकवडी गावठाण येथील नागरीक मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरुन ये-जा करीत असतात. तीन हत्ती चौक-गुलाबनगर-धनकवडी पोस्ट ऑफिस चौक या ठिकाणावरुन दत्तनगर आंबेगाव कडे जाणाऱ्या वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे.
या संपूर्ण रस्त्यावर कोठेही वाहतूक पोलीस उपलब्ध नसल्यामुळे अनेकवेळा शिवांजली चौक, धनकवडी पोस्ट ऑफिस चौक, गुलाबनगर चौक या ठिकाणी नागरीकांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो.
यामुळे जेष्ठ नागरीक, महिला व विद्यार्थी यांना या रस्त्यावरुन पायी चालणे कठीण होत आहे. बीआरटीतुन जाणाऱ्या बस स्वारगेट ते कात्रज जाणारे नागरिक चारही बाजूंनी वाहतूक कोंडी होत आहे. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी चौकाचौकांत झेब्रा क्रॉसिंग आखलेले पाहिजे मात्र, या चौकात सातारा रस्त्याने येणाऱ्या वाहनांसाठी सिग्नला 'स्टॉप लाइन'च नाही. त्यामुळे ही वाहने हळूहळू चौकात मध्यभागी येतात. त्यामुळे रस्ता ओलांडणाऱ्या प्रवाशांना या वाहनांतूनच मार्ग काढावा लागतो.
नागरिक
1) वसंत सकुंडे - बॅग घेऊन रस्त्यावरून चालणेही अवघड असताना, माझ्या सारख्या वृद्ध माणसाने या कोंडीतून धावत रस्ता ओलांडणे अपेक्षित आहे. का असा प्रश्न यावेळी उपस्थित केला. ज्येष्ठ नागरिक
2) दररोज मुलांना शाळेतून ने-आन करावी. मात्र कायम वाहतूक कोंडी होते. आणि चारही बाजूंनी गाड्या अंगावर येतात त्यामुळे रस्ता ओलांडताना भीती वाटते. त्यामुळे येथे वाहतूक पोलीस असणे आवश्यक आहे. महिला-सारिका बाबर
३) स्थानिक माजी नगरसेवक येथील वाहतूक कोंडीबाबत पत्राद्वारे वाहतुक पोलीस सहकारगर वाहतूक पोलीस, भरती विद्यापीठ वाहतूक विभाग तसेच नियुक्तीबाबत योग्य ती कार्यवाही करावी व परीसरातील नागरीकांची वाहतुक कोंडीतून सुटका करावी हे कळवूनही कोणती कार्यवाही होत नाही.
4) "वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न सुरू आहेत. मात्र वाढता ताण पाहता मनुष्यबळ कमी पडत असून वाढविण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्याच्यादृष्टीने नियोजन सुरू आहे. "एस. पी. पवार, पोलीस उपनिरीक्षक, भारती विद्यापीठ वाहतूक विभाग